31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईपंकजा मुंडेंचा सल्ला, मुंबई बंद केल्यास फायदा होईल

पंकजा मुंडेंचा सल्ला, मुंबई बंद केल्यास फायदा होईल

टीम लय भारी

मुंबई :  ‘करोना’चा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. लोकांनी नियोजनपूर्वक घरातूनच काम करावे. उपनगरीय सेवा सात दिवसांसाठी बंद केल्यास लाखो लोक साथ पसरण्यापासून दूर राहतील. अत्यावश्यक सेवांचीच दुकाने चालू ठेवावीत. हा प्रयत्न फायद्याचा ठरेल असे आवाहन पंकजाताईंनी केले आहे. पंकजाताई मुंडे यांनी एक ट्विट केले असून त्यात सरकारचा उल्लेख न करता हा सल्ला दिला आहे.

महापालिका निवडणुका लांबणीवर

नवी मुंबई, वसई – विरार व औरंगाबाद येथील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ‘करोना’चा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील १२ हजार ग्रामपंचायतींच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सुद्धा लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

Breaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश टोपे

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी