35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यBreaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश...

Breaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश टोपे

टीम लय भारी

मुंबई : अत्यावश्यक उत्पादन करणाऱ्या कंपन्या वगळता अन्य सर्व कंपन्यांनी आपले शंभर टक्के काम थांबविण्याची तयारी दर्शविली आहे. केवळ ५० टक्केच नव्हे, तर शंभर टक्के काम थांबविण्याची तयारी खासगी कंपन्यांची आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मूभा देण्यास कंपन्या तयार आहेत. त्यामुळे राज्यातील खासगी कंपन्यांतील काम किती प्रमाणात बंद करायचे याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. ‘करोना’शी मुकाबला करण्याकरीता ‘सीएसआर’मधून निधी देण्याची तयारी सुद्धा या सगळ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दर्शविली असल्याचेही टोपे म्हणाले.

Breaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश टोपे

जवळपास २० ते २५ खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत राजेश टोपे यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते. यात फार्मा, बँकिंग व मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत ‘करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सगळ्या कंपन्यांनी 100 टक्के काम थांबवण्याची तयारी दाखविली आहे. आमचे सगळे कर्मचारी घरून काम करतील. कर्मचाऱ्यांसोबतच्या बैठकासुद्धा डिजिटल माध्यमातून घेण्याची तयारी या कंपन्यांनी दाखविली आहे. परंतु औषधे बनविणाऱ्या व हाताळणाऱ्या उद्योगांसारख्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवाव्यात अशी सुचना या कंपन्यांनी केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या अत्यंत गरीब लोकांच्या पोटावर पाय येऊ नये याचीही काळजी घेण्याची सुचना त्यांनी केली आहे. मात्र ज्या अत्यावश्यक सेवा नाहीत त्या आम्ही तात्काळ बंद करू शकतो, असे कंपन्यांनी म्हटले आहे. ‘करोना’वर अद्याप औषधाचा शोध लागलेला नाही. पण ज्या औषधांच्या माध्यमातून इलाज करता येतो त्या औषधांची यादी मिळाली तर आम्ही मोफत औषध पुरवठा करू अशी तयारी औषध कंपन्यांनी दाखविली आहे. ‘करोना’विषयी जागृती करण्यासाठी जाहिरात देणे, प्रचार साहित्य बनविणे इत्यादी बाबींसाठी खर्च करण्याची तयारी सुद्धा या कंपन्यांनी दाखविल्याचे टोपे म्हणाले.

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ‘लय भारी’ ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

मुंबईतील रेल्वे गाड्या व मेट्रो रेल्वे व बसेसमधील गर्दी थांबविण्याची गरज आहे. त्याबाबत आम्ही आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही मुद्दे मांडणार आहोत. त्यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असेही टोपे म्हणाले. राज्यात सध्या ३९ करोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकजणाचा सकाळी मृत्यू झाला. पण हा मृत्यू ‘करोना’मुळे झाला आहे की, अन्य कारणांमुळे हे अद्याप समजलेले नाही असे टोपे म्हणाले. मंत्रालयातील अधिकाऱ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या अधिकाऱ्याच्या नातलगांना ‘करोना’ आढळून आला आहे. पण अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना ‘करोना’ची लागण झाली नसल्याचे टोपे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी