33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजबीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा, भाजप जिल्हाध्यक्षांसह 51 जणांवर गुन्हा

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा, भाजप जिल्हाध्यक्षांसह 51 जणांवर गुन्हा

टीम लय भारी

बीड : बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तब्बल 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही समावेश आहे.

काय आहे प्रकरण?
बीड तालुक्यातील चऱ्हाटा फाटा येथील जुगाराच्या अड्यावर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत 47 जुगाऱ्यांसह तब्बल 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

संजय राऊत यांचे विधानसभेसाठी भाजपला आव्हान

धनंजय मुंडेंचे धडाकेबाज काम, जिल्हा जातपडताळणी समित्यांना एकाच दिवसात मिळाले 14 अधिकारी

बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
जुगार अड्ड्यावर झालेली बीड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 51 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत हा जुगार अड्डा भाड्याने सुरु असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मस्के यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राजेंद्र मस्केंनी आरोप फेटाळले
दरम्यान, माझा आणि जुगार अड्ड्याचा काहीही संबंध नाही. ती जागा माझ्या मालकीची नाही, तर माझे भाऊ मदन मस्के यांची आहे, असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून मला गोवलं जात आहे. पोलिसांनी कसलीही चौकशी न करता माझे नाव घेतले. मी न्यायालयात दाद मागणार, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मस्के यांनी माध्यमांसमोर दिली.

‘भाजप आम्हाला जितका त्रास देईल, तेवढे आम्हाला जास्त यश मिळेल’

‘Meow, Meow, Meow’, Shouts BJP MLA Nitesh Rane As Aaditya Thackeray Enters Maha Assembly | WATCH

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी