33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयLGBTQ समाजाबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

LGBTQ समाजाबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुधारित विद्यापीठ विधेयकात एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुहाच्या प्रतिनिधींनाही सदस्य म्हणून नियुक्तीच्या तरतुदीला विरोध केला आहे. तसेच समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? असा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असं वादग्रस्त वक्तव्यही केलंय. ते मंगळवारी (२८ डिसेंबर) विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात विद्यापीठ सुधारणा विधेयकावर बोलत होते(Sudhir Mungantiwar statement about LGBTQ community).

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? कोणी व्यक्ती मी समलैंगिक आहे, मला समलैंगिक संबंध ठेवण्याचं आकर्षण आहे असं लिहून देईन का? हे कोण सिद्ध करणार सचिव, मंत्री, राज्यमंत्री? तुम्ही सिद्ध करणार आहे का? याला समलैंगिक संबंधाचं आकर्षण आहे असं मंत्री उदय सामंत लिहून देणार आहेत का? यापुढे तर आणखी एक अलैंगिक संबंध आहेत. याची अजून कोणी परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य. आता तो जनावर त्याला प्रमाणपत्र देणार का की याने माझ्याशी संबंध ठेवला.”

सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळे ही पॉझिटिव्ह

आरोग्य भरती परीक्षेतील आणखी एक गैरव्यवहार उघड

अधिवेशनात नेमकं काय घडलं? 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा आधार घेत विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं. यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यावेळी उदय सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व लिंगाच्या व्यक्तींना म्हणजेच एलजीबीटीक्यू व्यक्तींनाही प्रवाहात आणण्यासाठी समान संधी देण्याचा मुद्दा सांगितला. तसेच विद्यापीठ सुधारणा कायद्यात अशा व्यक्तींनाही विद्यापीठावर प्रतिनिधीत्व देत सदस्य म्हणून नियुक्तीची तरतूद विधेयकात केली. याला तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालाचाही संदर्भ देण्यात आला.

“विधेयक संयुक्त समितीकडे पाठवावं”

अधिवेशनात हे विधेयक सादर होताच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, “माझा या बिलावर आक्षेप आहे. या विधेयकात काही गोष्टी अस्पष्ट आहेत, त्या सिद्ध होत नाहीत. त्यावर संयुक्त समिती केल्यावर पुढे गेलो असतो. या विधेयकात सदस्य कुणाला करता येईल हे सांगताना समलिंगी संबंध असणारी स्त्री (लेस्बियन), समलिंगी संबंध असणारा पुरूष (गे) यांना सदस्य म्हणून नियुक्त करता येईल असं सांगितलं. उभयलिंगी संबंध असणारा व्यक्ती (बायसेक्शुअल), तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरूष (क्यूर) याला सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार आहे. आंतरलैंगिक, अलैंगिक व इतरांचाही या यादीत समावेश आहे.”

MHADA Paper Leak | घरातली वस्तू कधी मिळणार, म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी आरोपींचा होता हा कोडवर्ड

Mumbai: Mungantiwar takes a dig at MVA govt saying penguins are more powerful than the ministers

“म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य”

“हे कोण सिद्ध करेन. तुम्ही सिद्ध करणार आहात का? याचं प्रमाणपत्र कुलगुरू करणार का? ते याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे असं लिहून देईन का? हे सिद्ध तुमच्यापैकी की अधिकारी सिद्ध करणार आहे? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? कोणी व्यक्ती मी समलैंगिक आहे, मला समलैंगिक संबंध ठेवण्याचं आकर्षण आहे असं लिहून देईन का? हे कोण सिद्ध करणार सचिव, मंत्री, राज्यमंत्री? तुम्ही सिद्ध करणार आहे का? याला समलैंगिक संबंधाचं आकर्षण आहे असं मंत्री उदय सामंत लिहून देणार आहेत का? यापुढे तर आणखी एक अलैंगिक संबंध आहेत. याची अजून कोणी परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य. आता तो जनावर त्याला प्रमाणपत्र देणार का की याने माझ्याशी संबंध ठेवला?” असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

“या व्यक्तीला समलिंगी संबंधाचं आकर्षण आहे हे मंत्री उदय सामंत सिद्ध करणार का?”

मुनगंटीवार पुढे म्हणाले, “आपण काय कायदे करत आहोत, काही चर्चा करणार आहोत की नाही. एवढा हट्ट? हे विधेयक आहे का, हा बिलाचा भाग आहे. कोण सिद्ध करेन, तुम्ही सिद्ध करणार आहे का की या व्यक्तीला समलिंगी संबंधाचं आकर्षण आहे, मंत्री उदय सामंत. असं सिद्ध करणार आहे का? हे काय सुरू आहे? हे बिल राखून ठेवावं अशी माझी विनंती आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी