33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeराजकीयPolitics : मुख्यमंत्र्यांचे कौतुकाचे होर्डिंग, तर विरोधकांकडून रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेल्याचे...

Politics : मुख्यमंत्र्यांचे कौतुकाचे होर्डिंग, तर विरोधकांकडून रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेल्याचे होर्डिंग

टीम लय भारी

मुंबई : एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. त्यातच मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर अनेक ठिकाणी वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य यंत्रणेसमोर नवी आव्हाने उभी करत आहेत. यावरुन विरोधी पक्ष भाजपने देखील राज्य सरकार कोरोना नियंत्रणात अपयशी ठरल्याचा आरोप करत (Politics) चांगलेच धारेवर धरले आहे. असे असताना मुंबईत मात्र ठिकठिकाणी कोरोना परिस्थिती हाताळणा-या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव करणारे होर्डिंग लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याचं सांगत मुंबईत अनेक ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यात आले आहे. शहरातील ही होर्डिंग बरिच कल्पक असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे या होर्डिंगवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. हे होर्डिंग हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी, असाही या होर्डिंगचा हेतू असल्याची चर्चा आहे.

Politics : मुख्यमंत्र्यांचे कौतुकाचे होर्डिंग, तर विरोधकांकडून रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेल्याचे होर्डिंग

मुंबईत ठिकठिकाणी लावलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे होर्डिंग एका खासगी जाहिरात एजन्सीकडून लावण्यात आले आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. दुसरीकडे खासगी जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावरुन विरोधीपक्षाने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आधी भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला पिछाडीवर सोडले होतं. आता एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने चिंता वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी