32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयपुण्यातील शाळा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची माहिती

पुण्यातील शाळा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची माहिती

टीम लय भारी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील सर्व वर्गांसाठीच्या सर्व शाळा 7 फेब्रुवारीपासून पूर्ण दिवस (नियमित तास) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता हाफ डे बंद करून पूर्णवेळ शाळा सुरू करणार, हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.( Ajit Pawar, Schools in Pune will start from February 7)

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 15-17 वयोगटातील लस उपलब्ध नसल्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली. आमदार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी यांनी येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये स्लब कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतचाही आढावा घेत माहिती दिली यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

वाईन आणि दारू यात फरक असतो; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

पुण्यातील शाळा, महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार ,अजित पवार

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Active Covid-19 cases in Pune down by 50 per cent: Ajit Pawar

“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५-१७ वयोगटातील लसींचा साठा पुरेसा नसल्याचे निदर्शनास आले आहे. आज आणि उद्याचाही साठा नाही, सोमवारपर्यंत नवीन साठा प्राप्त होईल. या भागातील या वयोगटाचे लसीकरण त्यामुळे कमी होत आहे. सोमवारी लस मिळेल. मुंबईला गेल्यावर केंद्राशी संपर्क साधून लस मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोविड सेंटर बंद आहे. त्याला भाडं द्यावं लागत आहे. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहून मार्चमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं ठरलं आहे. ,” असे ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती पवार यांनी दिली. याबरोबरच जिल्ह्यात तसेच महानगरपालिकांच्या हद्दीत होणाऱ्या बैलगाडा शर्यत , खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी परवानग्या मी मागितल्या जात आहेत. मात्र त्याच्या हद्दीतील प्रशासनाने परवानगी द्यायची की नाही तो निर्णय घ्यायचा असल्याचेही ते म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी