31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांची तारीख ठरली, अमित देशमुखांची घोषणा

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांची तारीख ठरली, अमित देशमुखांची घोषणा

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या संकटामुळे ठाकरे सरकारने राज्यातील वैद्यकीय विद्यार्थांच्या परीक्षा (Examination) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आज वैद्यकीय परीक्षांच्या परीक्षांच्या तारखा सरकारने जाहीर केल्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा (Examination) आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे (A copy of the University of Health Sciences has been given by the Chancellor and Medical Education Minister Amit Deshmukh).

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या (Medical students) परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा (Examination) नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांमध्ये (Examination) एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बी एचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा (Examination) समावेश आहे. या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावरून फडणवीसांना रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

कोरोना लसीकरणाबाबत नितीन गडकरी यांचा मोदी सरकारला सल्ला

Cyclone Tauktae aftermath: At least 22 dead, 65 missing from barge that sank in Arabian Sea

यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा (Examination) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी हा निर्णय घेतला होता. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा (Examination) जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

“महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या (Medical students) परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा (Examination) पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे,” अशी माहिती अमित देशमुख (Amit Deshmukh)  यांनी ट्विट करत दिली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी