30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का?...

मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का? : पृथ्वीराज चव्हाण

टीम लय भारी

मुंबई :-  तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विनाशाचे थैमान घातला आहे. हे चक्रीवादळ सोमवारी दुपारनंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले. तेव्हा तौत्के चक्रीवादळाचा ताशी 190 किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा केला. त्यावर मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला (Is Modi just the Prime Minister of Gujarat? Don’t they have ties with other states? : Prithviraj Chavan).

या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ) गुजरातचा दौरा करुन राज्याला 1000 कोटींची मदत जाहीर केली. त्यावरुन, विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी हे केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत का?(Gujarat the Prime Minister?), सवाल अनेकांनी विचारला आहे.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांची तारीख ठरली, अमित देशमुखांची घोषणा

गडकरींच्या सल्ल्यानंतर काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

Coronavirus: Former Rajasthan Chief Minister Jagannath Pahadia dies at 89

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. तसेच देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागालाही मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, गुजरात 1000 कोटींची मदत जाहीर केल्याने इतर राज्यांना मोदींनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे (Former Chief Minister and Congress leader Prithviraj Chavan has tweeted criticizing Prime Minister Narendra Modi).

तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात मोठे नुकसान केले आहे. या वादळाचा फटका 5 राज्यांना बसला आहे. परंतु, नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केवळ गुजरात दौराच केला, तसेच मदतही केवळ गुजरातसाठीच जाहीर केली. केवळ गुजरातचेच पंतप्रधान (The Prime Minister of Gujarat) असल्यासारखे ते का वागतात, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विचारला आहे. तसेच, वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यातील जनतेची अवहेलना का, असेही ते म्हणाले.

मृतांच्या वारसांना मदत जाहीर

गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते. 16 हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 40 हजार झाडे आणि 10 हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. तौत्के चक्रीवादळात मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले जाणार असल्याचे पंतप्रधान (Prime Minister) कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वीज पुरवठा खंडीत

चक्रीवादळामुळे सौराष्ट्र, दीव, उना इत्यादी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता. सुमारे 16 कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 12 रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. गुजरातच्या वेरावल बंदराजवळ अडकलेल्या ‘मत्स्य’ तसेच आणखी दोन नौकांमधून 16 जणांची गुजरात तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. तीन नौका मंगळवारी सकाळी समुद्रात गेल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी