ऑटोमोबाईल

आता सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार अग्रेसर

टीम लय भारी

नवी दिल्ली : रोड सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातील प्रवाशांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अधिक सुरक्षा मिळणार आहे. या निर्णयाबाबतची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वटरवरून दिली आहे(6 airbags are mandatory in all cars).

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, ८ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटार वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने आता किमान ६ एअरबॅग्ज अनिवार्य करण्यासाठी जीएसआरला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामध्ये सर्व कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे.

गडकरी यांनी म्हटले आहे की, याआधीच केंद्र सरकारने यापूर्वीच  १ जुलै २०१९ पासून चालकाच्या सीटसाठी ए्अरबॅग अनिवार्य केल्या होत्या. यावर्षी १ जानेवारी २०२२ पासून चालकासह समोरील सहप्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कार उत्पादक कंपन्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे. सध्याच्या घडीला एका एअरबॅगची किंमत १८०० ते २००० रुपयांदरम्यान आहे. यानुसार  कार उत्पादक कंपन्यांना ६ एअरबॅग लावण्यासाठी एकूण दहा हजार ते १२ हजार रुपये खर्च उचलावा लागणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या मते या निर्णामुळे एअरबॅगच्या मागणीत वाढ होत असल्याने याची किंमतही कमी होणार आहे.

हे सुद्धा वाचा…

रोहित पवारांनी केंद्र सरकारला आर्थिक नियोजनाचा दिला सल्ला!

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावे

लवकरच देहविक्री करणाऱ्या महिलांना मिळणार शिधापत्रिका

Nitin Gadkari: Will mandate 6 airbags in vehicles that can carry up to 8 passengers

गडकरी पुढे म्हणाले की, कारमध्ये पुढे आणि मागेल दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या रहिवाशांना पुढील आणि बाजूकडील टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, एम १ वाहन श्रेणीमध्ये ४ अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या एम १ कॅटेगरीमध्ये ५ ते ८ सीटर कारचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार मिड-रेंजच्या सर्व कारमद्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन साईड एअरबॅग आणि दोन साईड कार्टेनसुद्धा लागतील. यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांचीसुद्धा सुरक्षा सुनिश्चित होणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

होळकर पुलाखाली बसविणार मेकॅनिकल गेट

गोदावरी नदीला येणाऱ्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित मॅकेनिकल गेट (Mechanical gates)…

13 mins ago

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

6 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

7 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

8 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

8 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

17 hours ago