37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयरोहित पवारांनी केंद्र सरकारला आर्थिक नियोजनाचा दिला सल्ला!

रोहित पवारांनी केंद्र सरकारला आर्थिक नियोजनाचा दिला सल्ला!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम झाला आहे. लसीरकणासाठी रोहित पवारांनी केंद्र सरकारला आर्थिक नियोजनाचा सल्ला दिला आहे (Rohit Pawar has advised the central government on financial planning).

देशाला लसीकरणाची सर्वात जास्त गरज असल्याने आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी त्यासाठी वापरावे असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे (MLA Rohit Pawar has given it to the Central Government). याबद्दलचे ट्विट त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बेस्ट सीएम आहेत मनसेचा खोचक टोला

पश्चिम बंगाल लढवलं की मोदी रडतील, खासदाराची वाणी खरी ठरली

UP: Boy dies after police allegedly assault him for breaking Covid rules; constable suspended

आपल्या या ट्विटमध्ये पवार म्हणतात, “देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने (Central Government) व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील.”

कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलताना ते आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणतात, “राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथे कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचे प्रमाण ठरवावे. असे केले तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी