30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांच्या वक्तव्यांवर बाळासाहेब थोरांताची प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या वक्तव्यांवर बाळासाहेब थोरांताची प्रतिक्रिया

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत दिले. यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. “भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो हे समोर ठेवून पुढे काम करू” असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पैसे मागणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला खोचक टोला

Delhi violence: HC adjourns activist Gulfisha Fatima’s plea for release, cites large number of cases

स्वबळाबाबत चर्चा नाही

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी काल बैठक घेतली. मात्र कालच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीला साडे तीन वर्षे आहेत. जिथे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत तिथे फिरले पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना दिल्याचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

काँग्रेसची बैठक

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी काल बैठक घेतली. यामध्ये काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते. सरकारमध्ये आमचे काम कसे सुरू त्याचा आढावा घेतला. पालकमंत्री म्हणून काम चांगले झाले आहे. संपर्कमंत्री यांनी काम वाढवले पाहिजे ही सूचना दिली. काँग्रेसचे मंत्री म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे, काही विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला, असे बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) सांगितले.

कोणतीही नाराजी नाही

सरकार तीन पक्षांचे आहे. जे प्रश्न निर्माण झाले त्याचा मार्ग काढतो, प्रश्न सुटलेले दिसतात. पदोन्नती आरक्षणाबाबत न्यायलयात प्रकरण आहे. त्यानुसार कारवाई होणार आहे. गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे हा सरकारचा हेतू आहे, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असेही बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) सांगितले आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक

विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होईल, कोण असेल याबाबत नाव तेव्हा ठरेल, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. नाना पटोले यांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने, काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदी कोणाला संधी दिली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी