व्यापार-पैसा

तुमचे पॅन आधार लिंक आहे की नाही ते असे तपासा

आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदतवाढ मिळाली असली तरी गाफील राहू नका. तुमचे पॅन आधार लिंक आहे की नाही ते तपासून पाहा. स्टेप बाय स्टेप ते कसे चेक करायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे लिंक केले नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टीत आर्थिक फटका बसू शकतो, हे आधीच आम्ही सांगितलेले आहे. त्यामुळे आधार-पॅन लिंक केलेले नसल्यास 30 जून पर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आजिबात थांबू नका. आजच हे काम आवरून घ्या.

तुम्ही पॅन-आधार लिंक केले आहे की नाही ते स्टेप बाय स्टेप ऑनलाइन तपासा :
  1. आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in च्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
  2. वेबसाइटच्या उजव्या बाजूला ‘क्विक लिंक्स’चा पर्याय दिसेल.
  3. येथे जा आणि ‘Verify your PAN’ पर्यायावर क्लिक करा.
  4. यानंतर, पॅन क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती जसे की तुमचे नाव, जन्मतारीख प्रविष्ट करा.
  5. पॅन नंबरची सत्यता तपासण्यासाठी ‘व्हेरिफाय’ बटणावर क्लिक करा.
  6. यानंतर तुमच्या समोर एक पॉप-अप ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची पॅन-आधार लिंक आहे की नाही याची संपूर्ण माहिती मिळेल.

 

लक्षात ठेवा तुम्ही आधार-पॅन लिंक केले नसेल तर अधिक टीडीएस कापला जाईल, तो नंतर तुमच्या खात्यात जमा होणार नाही. जर तुमचे पॅन कार्ड अवैध झाले तर तुम्हाला सामान्य दरापेक्षा जास्त टीडीएस भरावा लागेल. तसेच, कापलेल्या टीडीएसवर दावा करण्यात अडचण येणार आहे. ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. याशिवाय तुम्हाला इतरही अनेक आर्थिक फटके बसू शकतील. या इथे क्लिक करून तुम्ही त्यांची तपशीलवार माहिती घेऊ शकता. तुम्ही पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणी केलेली नसल्यास ती कशी करायची, ते इथे क्लिक करून तपशीलवार समजून घ्या.

 

आम्ही पुन्हा एकदा सांगत आहोत, की आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 30 जून पर्यंत वाढवून दिली असली तरी  शेवटच्या दिवसापर्यंत आजिबात थांबू नका.

 

Check PAN Aadhaar link Status, step by step guide, How to check Pan aadhar link, my aadhar pan link status, Pan Card Aadhar Card
विक्रांत पाटील

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

19 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

19 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

19 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

19 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

20 hours ago