35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्यापार-पैसाDiwali Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचे 'दिवाळी गिफ्ट'; महागाई भत्त्यात 9 टक्क्याने...

Diwali Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचे ‘दिवाळी गिफ्ट’; महागाई भत्त्यात 9 टक्क्याने वाढ

सध्या सर्वत्र दिवाळीच्या आगमनामुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचते पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत केंद्रसरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खास दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे.

सध्या सर्वत्र दिवाळीच्या आगमनामुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचते पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत केंद्रसरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खास दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्र सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली आहे. या वाढीनंतर सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 203 टक्क्यांवरून 212 टक्के झाला आहे. डीएचे नवीन दर 1 जुलै 2022 पासून लागू मानले जातील. याशिवाय पाचव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 15 टक्क्यांनी वाढवून 396 टक्के करण्यात आला आहे. या कर्मचार्‍यांची वाढही 1 जुलैपासून लागू मानली जाईल.

कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आधारावर महागाई भत्ता निश्चित केला जातो. जर एखाद्या केंद्रीय कर्मचार्‍याचे मूळ वेतन दरमहा 43000 रुपये असेल, तर त्याला जुन्या डीए (203 टक्के) अंतर्गत 87,290 रुपये मिळाले असते. त्याच वेळी, डीए 212 टक्के झाल्यानंतर, तो 91,160 रुपये होईल. यामुळे त्याच्या पगारात सुमारे 3800 रुपयांची वाढ होणार आहे. खर्च विभाग (DOI) ने 12 ऑक्टोबर रोजी डीए वाढीबद्दल माहिती देणारे कार्यालयीन निवेदन जारी केले होते.

हे सुद्धा वाचा

Former Congress Minister Arrested : काँग्रेसच्या माजी मंत्र्याला रंगेहात अटक! 50 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप

Mahavikas Aghadi : आज मी भविष्यवाणी करतो… केंद्रात महाआघाडीचे सरकार येणार; लालुंच्या मुलाने केले भाकीत!

Salman Khan : पुढल्या वर्षीची ईद-दिवाळी भाईजानच्या नावावर! दोन मोठे सिनेमे येणार भेटीला

डीए वाढण्याचे कारण काय?
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार किंवा पेन्शन घेणार्‍या कर्मचार्‍यांचा डीए आणि डीआर (महागाई सवलत) सप्टेंबरमध्ये 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. तेव्हापासून, सहाव्या आणि पाचव्या वेतन आयोगांतर्गत पगार किंवा पेन्शन घेणारे कर्मचारी/माजी कर्मचारी डीए किंवा डीआर वाढवण्याची मागणी करत होते.

महागाई भत्ता म्हणजे काय?
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाईशी लढण्यासाठी भत्ता देते. याला महागाई भत्ता (कर्मचाऱ्यांसाठी) आणि महागाई सवलत (पेन्शनधारकांसाठी) म्हणतात. केंद्र सरकार जुलै आणि जानेवारीमध्ये त्याचा आढावा घेते. कर्मचारी ज्या क्षेत्रात काम करतो त्यावर DA देखील अवलंबून असतो. म्हणजेच शहरी भागात, लहान शहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए वेगळा असतो.

गणना कशी करायची?
कर्मचार्‍याच्या मूळ वेतनाच्या आधारावर डीएची गणना केली जाते. मूळ वेतनात कोणतेही विशेष पेमेंट नाही आणि ते निव्वळ वेतन आहे. क्लिअरचे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणतात की जगभर महागाई शिगेला असताना महागाई भत्ता वाढल्याने पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी