35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयFormer Congress Minister Arrested : काँग्रेसच्या माजी मंत्र्याला रंगेहात अटक! 50 लाख...

Former Congress Minister Arrested : काँग्रेसच्या माजी मंत्र्याला रंगेहात अटक! 50 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप

पंजाबच्या माजी काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सुंदर शाम अरोरा यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. पंजाब दक्षता ब्युरोने अरोरा याला लाच देताना रंगेहात पकडले होते, त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

पंजाबच्या माजी काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सुंदर शाम अरोरा यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. पंजाब दक्षता ब्युरोने अरोरा याला लाच देताना रंगेहात पकडले होते, त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली. सुंदर शाम यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कारवाई सुरू होती. हीच कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्याने दक्षता ब्युरोच्या एका अधिकाऱ्याला लाच देऊ केली. तो हा प्रकार करण्याचा प्रयत्न करत असताना दक्षता पथक त्याचा माग काढत होते. त्याने अधिकाऱ्याला लाच घेण्यास सांगताच तातडीने दक्षता पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर अरोरा यांनी सहाय्यक महानिरीक्षक (एआयजी) मनमोहन कुमार यांना 50 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता आणि ते करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. दक्षता पथकाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, अरोरा यांना एआयजी मनमोहन कुमार यांना 50 लाखांची लाच देताना अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींकडून 50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

Mahavikas Aghadi : आज मी भविष्यवाणी करतो… केंद्रात महाआघाडीचे सरकार येणार; लालुंच्या मुलाने केले भाकीत!

Salman Khan : पुढल्या वर्षीची ईद-दिवाळी भाईजानच्या नावावर! दोन मोठे सिनेमे येणार भेटीला

Chandrakant Patil : शेतकऱ्यांसाठी चंद्रकात पाटील यांचे मोठे विधान!

दुप्पट लाच ऑफर
मनमोहन कुमार यांच्या वक्तव्याच्या आधारे अरोरा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे दक्षता ब्युरोने म्हटले आहे. मनमोहन यांनी सांगितले की, सुंदर शाम अरोरा यांनी 14 ऑक्टोबर रोजी त्यांची भेट घेतली होती आणि दक्षता ब्युरोच्या दक्षता तपासापासून दूर राहण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच देऊ केली होती. अरोरा यांनी 15 ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्याला 50 लाख रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली होती आणि उर्वरित रक्कम नंतर देऊ असे सांगितले होते. काल रात्री जेव्हा अरोरा नोटांनी भरलेली बॅग मनमोहनला देत होते. त्यानंतर दक्षता अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी सुंदर शामचा स्वीय सहाय्यक (पीए) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षता विभागाने सापळा रचला
दक्षता ब्युरोने सुंदरला रंगेहात पकडण्याची योजना आखली. मनमोहन यांनी दक्षता प्रमुखांना लाचेची माहिती देताच माजी मंत्र्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला. एडीजीपी दक्षता यांनी सांगितले की, सुंदर अरोरा हे मनमोहन यांना चांगले ओळखतात, त्यामुळे त्यांनी मनमोहनशी संपर्क साधला. एडीजीपींनी मनमोहन यांचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांनी विभागाला याबद्दल माहिती दिली हे अत्यंत कौतुकास्पद आहे. दक्षता ब्युरो अरोरा विरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणासह अनेक प्रकरणांची चौकशी करत आहे. दक्षता ब्युरोने अरोरा यांना दोनदा समन्स बजावले होते आणि त्यांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. अरोरा हे पंजाबच्या मागील कॅप्टन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निष्ठावंतांपैकी एक होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर अरोरा काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी