35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्यापार-पैसासुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

सुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची नवजात कन्यांसाठी राबविण्यात येणारी योजना आहे. यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी सरकारचे पाठबळ मिळते. 2015 सालापासून राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून मुबलक व्याजदर खतेदाराला प्राप्त होते, त्याचप्रमाणे या योजनेत कर लाभ सुद्धा मिळतो. याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण परिसरातील पोस्ट कार्यालयाला किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत भेट देऊन आपले खाते उघडू शकता.

सरकारने 1 एप्रिलपासून सुकन्या समृद्धी योजनेवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. आता या योजनेत गुंतवणूक केलेल्यांना दरवर्षी 8 टक्के व्याज मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलीसाठी 1.35 लाख ते 70 लाख रुपयांपर्यंत व्यवस्था करू शकता. सरकार यावर खूप चांगले व्याजदर तसेच कर सूट देते. त्याचप्रमाणे तुम्ही दरवर्षी फक्त 250 रुपये जमा केले तरी खाते चालूच राहील. मात्र खाते उघडल्यानंतरही दरवर्षी किमान 250 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. कोणत्याही वर्षात 250 रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा केल्यास ते खाते डिफॉल्ट खात्याच्या श्रेणीत टाकले जाईल. तथापि, दंड आणि थकबाकी जमा करून ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते.

आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावयाचे असल्यास तुम्ही सुकन्या समृद्धीचे खाते उघडू शकता. 10 वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना असून, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे अशा प्रकारचे खाते सुरू करू शकता. जुळ्या अथवा तीन मुलींचा जन्म झाला असल्यास दोनपेक्षा अधिक खाते उघडू शकता. केवळ 250 रुपयांमध्ये मुलीचे खाते उघडता येते. यंदाच्या आर्थिक वर्षातील समृद्धी योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रक्कम गुंतवली जाऊ शकते, या योजनेत 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदाही मिळतो.

हे सुद्धा वाचा: 

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ग्रामसुरक्षा योजना

अल्प बचत योजना: पॅन आधार अनिवार्य; अन्यथा चालू खाते बंद होईल!

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांनी तुमचे पैसे होतील दुपट्ट, वाचा सविस्तर

योजनेची वैशिष्ट्ये
१) या योजनेअंतर्गत 10 वर्ष वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात ‘सुकन्या समृद्धी ‘ खाते उघडता येते, यात किमान 1000रु. ठेवावे लागतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल 1.5 लाख रु. टाकता येतात.
२ ) खाते उघडल्यानंतर 21वर्षापर्यंत किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास जी मुदत आधी असेल ती व्याजासह ठेव परत मिळते.
३) 18वर्षे  वयानंतर शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याची  मुदत असते. उर्वरित रक्कम  पुढे केव्हाही (21 वर्षे मुदत संपेपर्यंत )काढ़ता येईल.

खाते अकाली बंद करण्याची मुभा
1) खातेदार मुलीच्या मृत्यूकारणी
2) खात्यात गुंतलेल्या पालकाच्या मृत्यूकारणी
3) मुलीच्या जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठी
4) मुलीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्विकारल्यावर

Sukanya Prosperity Scheme, girl child scheme, post office scheme, Sukanya Prosperity Scheme: The future will be as secure as possible for girl child.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी