33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमपुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक संशयित डॉ. तेजस मदन गर्गे यांच्यासाठी सहायक संचालक संशयित आरती आळे यांनी लाच घेतल्यानंतर गर्गे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.७) रंगेहात जाळ्यात घेतले. गर्गे यांनी लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक संशयित डॉ. तेजस मदन गर्गे (Tejas Garge) यांच्यासाठी सहायक संचालक संशयित आरती आळे यांनी लाच घेतल्यानंतर गर्गे (Tejas Garge) फरार (absconding) झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना (police teams sent) करण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.७) रंगेहात जाळ्यात घेतले. गर्गे यांनी लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.(Archaeology Department director Tejas Garge absconding, police teams sent )

रामशेज येथे कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिक सहायक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहायक संचालक पुरातत्त्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात पुरातत्त्व विभाग नाशिक येथील सहायक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी (दि. ६) १ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या आदेशान्वये सापळा रचण्यात आला. तडजोडअंती एवढीच लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी व सुवर्णा हांडोरे यांनी आळे यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर आळे यांनी पुरातत्त्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस मदन गर्गे यांना लाच स्वीकारल्याची माहिती सांगून त्यांचे हिश्श्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता त्यांच्या हिश्श्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली. यामुळे गर्गे यांच्याविरुद्धही इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसूती रजेमुळे अटक टळली पण …
संशयित आरती आळे या प्रसूती रजेवर असून त्यांची काही दिवसांपूर्वीच प्रसूती झाली असून त्यांनी तक्रारदारामार्फत राहत्या घरी अनमोल नयनतार गृहप्रकल्पातील फ्लॅट क्रमांक १७ मध्ये दीड लाख रुपये स्वीकारले.दरम्यान हा फ्लॅट गर्गे यांच्या नावावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर वरिष्ठ अधिकारी राज्याचे संचालक गर्गे यांना याबाबत माहिती देऊन हिश्शाबाबत विचारणा केली. गर्गे यांनी त्यास संमती दर्शविल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या प्रसूती रजेवर असल्याने त्यांची अटक टळली मात्र तपासात सहकार्य करणाचे लेखी त्यांच्याकडून घेण्यात आले आहे.

४० हजारची लाच घेताना उपअभियंता अडकला
जिल्हा परिषदेच्या सुरगाणा उपविभागात उपअभियंता पदावर कार्यरत असलेले नंदलाल विक्रम सोनवणे यांनी २० लाख रुपयांच्या मंजूर निविदेपोटी २ टक्कयांप्रमाणे ४० हजर रुपये लाच घेतली. तक्रारदार ठेकेदाराला सुरगाणा येथे दोन गावात सिमेंट रस्ते बनवण्याचे काम देण्यात आले होते. ते काम निर्धारित वेळेत पूर्ण करूनही सोनावाने यांनी हे काम वेळेत पूर्ण केले नाही असे प्रमाणपात्र दिले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी