33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून जोरदार पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान वाजे यांच्या प्रचारार्थ पुढील आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,मुख्य प्रवक्ते संजय राऊत, सुषमा अंधारे,इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,इम्रान प्रतापगढी यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत,अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून जोरदार पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान वाजे यांच्या प्रचारार्थ पुढील आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,मुख्य प्रवक्ते संजय राऊत, सुषमा अंधारे,इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,इम्रान प्रतापगढी यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत,अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.(Maha Vikas Aghadi to address Uddhav Thackeray, Nana Patole’s campaign rally next week)

राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन व प्रचार यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) पदाधिकाऱ्यांची बैठक शालिमार चौकातील शिवसेना जिल्हा कार्यालयात पार पडली त्यावेळी बडगुजर बोलत होते.सर्व नेत्यांच्या प्रचार सभा विराट कशा होतील यादृष्टीने सूक्ष्म नियोजनही बैठकीत करण्यात आले.शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांची दिना 11 मे रोजी सातपूर आणि मध्यनाशिक तसेच 12 मे रोजी सुषमा अंधारे यांची देवळाली कॕम्पला प्रचार सभा होणार आहे.इम्रान प्रतापगढी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची 14 मे रोजी चौक मंडई येथे तर 15 मे रोजी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची अंनत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार असल्याने त्याचे सूक्ष्म नियोजन बैठकीत करण्यात आले.

बैठकीस शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महा नगरप्रमुख विलास शिंदे,माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले,शहराध्यक्ष गजानन शेलार,उप जिल्हाप्रमुख सचिन मराठे,कोर कमेटी सदस्य डी.जी सूर्यवंशी,माजी महापौर यतीन वाघ,बाळासाहेब वाघ,सुरेश दौलड,बाळासाहेब कोकणे,सचिन बांडे,विकास गिते,मसूद जिलानी आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी