34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्राईममुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे.चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक ( Bus-truck accident) यांचा भीषण अपघात झाला आहे.चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात ( Bus-truck accident) झाला आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.( Bus-truck accident on Mumbai-Agra highway)

जळगावहून वसई येथे जाणाऱ्या वसई आगाराची बस (एमएच १४, केक्यू ३६३१) ही चांदवडजवळील देवी मंदिराजवळील हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ आली असता, ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात बसचा वाहकाकडील अर्धा भाग अक्षरशः पूर्णपणे कापला गेला होता.

याच बाजूने पुढे बसलेल्या प्रवाशांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी जखमींचा आक्रोश, रक्ताचा सडा व रस्त्यावर पडलेले प्रवासी इतकं भयावह चित्र होते.

अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी शेवटच्या प्रवाशाला मदत होईपर्यंत उपस्थित होते. सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अत्यवस्थांना नाशिक, पिंपळगाव व मालेगाव येथील रुग्णालयांत पाठविण्यात आले. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३५ व्यक्तींना दुखापत झाली आहे. यापैकी आठ ते नऊ प्रवासी गंभीर असून, दोन पुरुष, एक अल्पवयीन मुलगा व एक महिला, अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातावेळी चांदवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मिळेल त्या वाहनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करीत होते. उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.

अपघातातील मृतांची नावे

खालिदा गुलाम हुसेन (वय ६०, रा. दर्गा रोड, भोईवाडा पोलिस ठाणे चाळ, भिवंडी), सुरेश तुकाराम सावंत (२८, रा. डोंगरगाव, ता. देवळा), साईल संजय देवरे (१४, रा. उमराणे), बळिराम सोनू अहिरे (६४, रा. शांतिवन कॉलनी, नाशिक).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी