31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो. तुम्ही गुळाचे सेवन उन्हाळ्यातही करु शकता. जेवणामध्ये किंवा काही पेयांमध्येही तुम्ही गुळाचा वापर करु शकता. गूळ खाणे फक्त हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही फायदेशीर असते. पुर्वीच्या काळी साखरेपेक्षा जास्त गुळाचा वापर पदार्थांमध्ये केला जातो. गूळ आणि साखर दोन्ही पदार्थ उसापासूनच तयार होतात. पण गूळ आरोग्यासाठी जास्त उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात गूळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो. तुम्ही गुळाचे ( jaggery) सेवन उन्हाळ्यातही करु शकता. जेवणामध्ये किंवा काही पेयांमध्येही तुम्ही गुळाचा वापर करु शकता. गूळ खाणे फक्त हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही फायदेशीर (Benefits in summer) असते. पुर्वीच्या काळी साखरेपेक्षा जास्त गुळाचा वापर पदार्थांमध्ये केला जातो. गूळ आणि साखर दोन्ही पदार्थ उसापासूनच तयार होतात. पण गूळ आरोग्यासाठी जास्त उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात गूळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.(Benefits of eating jaggery in summer)

भारतातील काही भागात उन्हातून कुणी घरी आलं की त्याला गूळ आणि पाणी देण्याची पद्धत आहे. कारण यामुळे उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो.

गूळ खाण्याचे फायदे.
गुळामध्ये व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते – शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास- मदत गुळामुळे रक्तातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्त कमी असते त्यांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

शरीराला ऊर्जा- शरीराला ऊर्जा मिळते गूळ आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतो. अशक्तपणा वाटत असल्यास गुळाचा तुकडा खाल्ल्यानेही बरे वाटते. अशक्तपणा दूर करण्यासाठी गूळ खूप उपयुक्त आहे.

सर्दी – पडसे कमी होते
काळी मिरी, आलं आणि गूळ मिसळून खा. यामुळे सर्दी-पडसे कमी होते. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यामुळे खोकला, घशातील खवखव दूर होते. आपला आवाज चांगला राहतो. गुळाचा चहा तयार करून सकाळी आणि संध्याकाळ प्या. यामुळे सर्दी, खोकला कमी होतो. तसेच ताप आला असेल तर तो देखील कमी होतो. गुळामुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो.

निद्रानाशाचा त्रास- दुधामध्ये गुळ टाकून ते दूध रात्री प्यायल्यामुळे निद्रानाशाची समस्यादेखील कमी होते.

बद्धकोष्ठता- बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मदत दुपारच्या जेवणानंतर गुळाचा एक तुकडा रोज खा. बद्धकोष्ठतेची समस्या यामुळे कमी होईल. गुळामुळे उन्हाळ्यात पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो. गुळात अनेक पाचक तत्व आढळतात, ते पोटाला आराम देण्याचे काम करतात.

शरीर थंड राहते- गुळामुळे आपले शरीर थंड राहते. गुळ वितळवून त्यात तुळस आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण प्या. यामुळे उष्माघात टाळता येतो. आपले शरीर थंड राहते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी