31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमनाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी  लुटल्याची घटना घडली आहे. तसेच कारवाईची भीती दाखवित ज्येष्ठ नागरिकाकडून सात लाख रुपयांची वसुली केल्याचा प्रकारही उघड झाला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूर रस्त्यावरील रहिवाशी श्रीकांत गजेंद्र शिंदे (वय ६१) रा. निळकंट पार्क, पंडित कॉलनी, नाशिक यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी (Cyber thieves )  लुटल्याची घटना घडली आहे. तसेच कारवाईची भीती दाखवित ज्येष्ठ नागरिकाकडून (senior citizen) सात लाख रुपयांची (Rs 7 lakh) वसुली केल्याचा प्रकारही उघड झाला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी  गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूर रस्त्यावरील रहिवाशी श्रीकांत गजेंद्र शिंदे (वय ६१) रा. निळकंट पार्क, पंडित कॉलनी, नाशिक यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.(Cyber thieves threaten senior citizen in Nashik’s Sharanpur and extort Rs 7 lakh)

त्यानुसार दोन मोबाइल क्रमांक धारकांसह एका खासगी बँक खातेधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. दरम्यान, शिंदे यांना २१ मार्च रोजी संशयितांनी फोन केला. ‘तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन एक बँक खाते उघडण्यात आले.
त्यावरुन खासगी बँकेत सहा कोटी आठ लाखांचा गैरव्यवहार करण्यात आला. त्यामुळे तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागणार आहे. कारवाई व्हावी, असे वाटत नसल्यास सात लाख रुपये द्यावे’, अशी मागणी करण्यात आली. घाबरलेल्या व्यावसायिकाने संबंधितांच्या मोबाइल क्रमांकावर सात लाख ३७ हजार रुपये जमा केले.

परंतु त्यानंतरही संशयितांची मागणी सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी सायबर पोलिसात (cyber police) धाव घेतली.त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात दोघा अज्ञात सायबर भामट्यांविरोधात फसवणूक व सायबर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या स्वरुपाचे गुन्हे वाढत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी