31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओपंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठा जातीचे ध्रुवीकरण त्यातून निर्माण होणारा रोष गेवराई, बीड(Beed) आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात जोरावर आहे.एकिकडे वंजारी समाजाचा भक्कम पाठिंबा पंकजा मुंडेंच्या बाजूने असला तरी मराठा,मुस्लिम बहुल मतं आणि महायुतीची ताकद ही बजरंग सोनवणे यांच्य बाजूने पहायला मिळतेय.

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठा जातीचे ध्रुवीकरण त्यातून निर्माण होणारा रोष गेवराई, बीड(Beed) आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात जोरावर आहे.एकिकडे वंजारी समाजाचा भक्कम पाठिंबा पंकजा मुंडेंच्या बाजूने असला तरी मराठा,मुस्लिम बहुल मतं आणि महायुतीची ताकद ही बजरंग सोनवणे यांच्य बाजूने पहायला मिळतेय.  त्यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार हे नक्की(Pankaja Munde and Bajrang Sonawane will have a close fight).
   मला आजपासून ५ वर्षापर्यंत सालगडी म्हणून ठेवा, असं वक्तव्य नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी मतदारांना केलंय. भाजपने बराच काळ पंकजा मुंडेंना साईडलाईन केलेलं, त्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी ही सर्वश्रुत असली तरी त्या पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ राहील्या आहेत. २०१४ ला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनाने ती सहानुभूती पंकजा मुंडेंना मिळाली नि त्या खासदारही झाल्या,शिवाय ग्रामीण भागात मतदारांशी विश्वासार्हाचं नातं आणखी घट्ट होऊ शकेल असं ग्रामविकास खातं ही त्यांना मिळालं. गोपीनाथ मुंडेंच्या(Gopinath Munde) हयातीत पंकजा मुंडेंना स्वत;च्या राजकीय ताकदीला सिध्द करण्याची गरज कधी पडली नसली तरी, त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांचेच बंधु धनंजय मुंडेंचे(Dhananjay Munde) आव्हान त्यांच्यासमोर हे होतेच. चिक्की घोटाळा असेल, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्याशी असलेले त्यांचे अंतर्गत वाद असतील याचाच परिणाम म्हणून २०१९ च्या विधानसभेत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांनंतर आपोआपच त्या भाजपमध्ये साईडलाईन केल्या गेल्या. पण असे असले तरी बीडमधील वंजारी समाजाचा फॅक्टर असेल, गोपिनाथ मुंडेंना मानणारा मोठ्ठा गट आणि त्यासोबतच मराठवाड्यातील राजकरणावर पंकजा मुंडेंची असलेली पकड असेल यामुळे भाजपला पंकजा मुंडेंना डावलण्याची रिस्क घेऊन चालणार नव्हतंच. नि त्यामुळेच भाजपामधील अतर्गंत कुरबुरीतून नाराज असल्याचे संदेश वारंवार देणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली. त्याचबरोबर  त्यांचे समर्थक राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना ही भाजपने उमेदवारी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी