34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमहिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना आग लागली होती. अग्नीशामक दलाने तात्काळ पोहचत आग आटोक्यात आणली.हिरावाडी रोडवर शुक्रवार (ता.०३) रोजी आग लागली. या आगीचे प्रमाण व तीव्रता अधिक होती की, आग तीस ते पंचेचाळीस फूट आगीचा डोंबडों उसळला होता.मोकळ्या भूखंडलगत असलेली उद्यान, एक चारचाकी वाहन जळून खाक झाले. तसेच एक पिंपळ व दोन गुलमोहर झाड जळून खाक झाली. त्यालगत असलेली मारुती अर्टिगा वाहन जळून खाक झालेले असून आगेची तीव्रता एवढी होती की बाजूला असलेले गार्डन मधील साहित्य जळून खाक झाले आहे.

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes) आग (Fire breaks) लागली होती. अग्नीशामक दलाने तात्काळ पोहचत आग आटोक्यात आणली.हिरावाडी रोडवर शुक्रवार (ता.०३) रोजी आग लागली. या आगीचे प्रमाण व तीव्रता अधिक होती की, आग तीस ते पंचेचाळीस फूट आगीचा डोंबडों उसळला होता.मोकळ्या भूखंडलगत असलेली उद्यान, एक चारचाकी वाहन जळून खाक झाले. तसेच एक पिंपळ व दोन गुलमोहर झाड जळून खाक झाली. त्यालगत असलेली मारुती अर्टिगा वाहन जळून खाक झालेले असून आगेची तीव्रता एवढी होती की बाजूला असलेले गार्डन मधील साहित्य जळून खाक झाले आहे.(Fire breaks out in pipes kept in open plot on Hirawadi Road)

याबाबत अधिक माहिती अशी की, हिरावाडी रोडवर नंदिनी अगरबत्ती पाठीमागे नंदिनी नगर आहे. या नंदिनी नगर मध्ये पंचवटीतील एका शेत उपयोगी अवजारे व मशिनरीचे दुकान आहे. मोकळ्या भूखंडावर दुकानातील शेत उपयोगी पाईप हे ठेवलेले होते. शुक्रवार ता.०३ रोजी सुमारे साडेचार वाजेच्या सुमारास या पाईपांना अचानक अचानक आग लागली. या परिसरातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते सागर दिघे यांनी अग्निशामक दल व पोलिस यांना संपर्क साधला. त्यावेळी पंचवटी पोलीस व अग्निशामक दलाचे तीन बंब लागलीच आले.

अग्नीशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी, लींडीं लीं गडीं फायरमन एस जे कानडे, व्हीं आर गायकवाड,डी पी पाटील, एन पी म्हस्के, एस डी जाधव, मंगेश पिंपळे, वाहन चालक ए बी सरोदे, कवर यांनी बजाविली.

हिरावाडी रोडवर लागलेली आग इतकी भीषण होती की, मोकळा भूखंड लगत उद्यानात असलेली साहित्य जळून खाक झाले. या आग लागलेल्या पाईपालगत एकूण चार वाहन लावलेली होती. त्यात मारुती सुझुकी ईरटीगा एमएच १५ जे एम ८१०० एम जळून खाक झाली. मात्र , या ईरटीगा लगत एक टाटा सुमो, एक आयशर, व्हेरिटो हे वाहन होते. आगीची तीव्रता अधिक होती. यासाठी परिसरातील युवक बंटी कापुरे यांनी उन्हामुळे तापलेल्या गाड्यांना पाणी मारले आणि त्या वाहनांना देखील आग लागू नये याची खबरदारी घेतली. उद्यानातील सुकलेल्या पाला पाचोळ्यामुळे आग लागली असावी. अशी शंका परिसरातील नागरिकांना असून रोज उद्यानाची साफसफाई करत असताना उद्यानातील कचरा व पालापाचोळा या भिंतीलगत जमा केला जातो. या सुकलेल्या पाला पाचोळ्याला तीव्र उन्हामुळे आग लागली व त्या शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पाईपापर्यंत ही आग पोहोचल्याने सदरची घटना घडल्याचे अंदाज आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी