34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना दिसत आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरतानाही उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.  यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्य सरकारने केलेली कामे सांगताना, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यातच विरोधकांवर सडकून टीका करत आहेत. मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना दिसत आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरतानाही उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.  यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्य सरकारने केलेली कामे सांगताना, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यातच विरोधकांवर सडकून टीका करत आहेत. मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है,(It is not difficult to defeat Modi, it is impossible) असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते.(It is not difficult to defeat Modi, it is impossible; Chief Minister Eknath Shinde)

त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले. मात्र, या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढा. आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेत कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले.

घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून मी जमिनीवर उतरुन काम करतोय. याआधीही मीच काम करत होतो पण, त्याचे श्रेय दुसरे घेत होते, असे सांगत ठाकरे गटावर हल्लाबोल केला. तसेच बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.तसेच बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे देशाला वाचवण्यासाठी लोकशाहीला पुढे नेण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.एकीकडे देशाला वाचवण्यासाठी लोकशाहीला पुढे नेण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडिया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी