35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमनाशकात भररस्त्यात एमडी ड्रग विक्री एकास अटक

नाशकात भररस्त्यात एमडी ड्रग विक्री एकास अटक

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सामनगाव रोडवर वजनकाटा घेऊन एमडी ड्रग्ज विक्री करणार्या संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ५८ हजारांची १९.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली आहे. अशारितीने शहरात आणखी कुठे-कुठे एमडीची विक्री होते आहे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. (Nashik Drugs crime Sale of MD on street ) किरण चंदू चव्हाण (२३, रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) असे एमडी ड्रग्ज विक्री करीत असताना अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिकरोड येथील सामनगाव रोडवर भरदिवसा रस्त्यालगत वजनकाटा घेऊन भाजीपाला-फळं विक्री होत असते, अगदी त्याप्रमाणेच एमडी (मॅफेड्रॉन) या अंमली पदार्थाचीही विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे पोलिसांनी यापूर्वी एमडी ड्रग्जचे अड्डे उदध्वस्त करूनही शहरात या अंमली पदार्थांची पोलिसांच्या नाकावर टिच्चून विक्री सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Nashik MD Drugs)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांची विक्री, साठा व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर गुन्हे शाखेची पथकांमार्फत शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांना सामनगाव रोड परिसरात एकजण एमडी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची खबर सोमवारी (ता. १८) मिळाली होती.< selling for MD drugs in Nashik >

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सापळा रचण्यास सांगितले असता, सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते, संजय सानप, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने सामनगाव रोडवरील सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या शिवशक्ती टायर वर्कससमोर सापळा रचला होता.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित किरण चव्हाण हा सामनगाव रोडवर आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास हेरले आणि ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५८ हजार १७० रुपयांची १९.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज्‌ जप्त करण्यात आली.त्याच्याकडून डीजीटल वजनकाटा, दोन मोबाईल, रिकामे प्लॅस्टिकचे पाऊच असा ६८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक काळे हे तपास करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी