30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये भीषण आगीने 15 घरांची राखरांगोळी

नाशिकमध्ये भीषण आगीने 15 घरांची राखरांगोळी

भारतनगर येथे आग लागून १५ घरे जळून राख झाली. संसारोपयोगी साहित्यासह लाखोंची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. घटनेत पाच जण जखमी झाले असून, यामध्ये एका वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीसह घरास जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात लागलेल्या आगीत शॉर्टसर्किट होऊन तसेच सिलिंडरचा स्फोट होऊन अन्य घरांनाही आग लागण्याची घटना शनिवार (ता. २०) दुपारी तीनच्या सुमारास घडली.एकमेकास लागून असलेल्या पत्रा, लाकडाच्या घरांनी काही वेळेतच रौद्ररूप धारण केले. त्यात १५ घरे जळून राख झाली, अशी माहिती नागरिकांकडून देण्यात आली. सर्व घरातील संसारोपयोगी साहित्यासह नवीन कपडे, रोख रक्कम जळून लाखांचे नुकसान झाले.

भारतनगर येथे आग (fire) लागून १५ घरे जळून राख झाली. संसारोपयोगी साहित्यासह लाखोंची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. घटनेत पाच जण जखमी झाले असून, यामध्ये एका वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीसह घरास जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात लागलेल्या आगीत शॉर्टसर्किट होऊन तसेच सिलिंडरचा स्फोट होऊन अन्य घरांनाही आग लागण्याची घटना शनिवार (ता. २०) दुपारी तीनच्या सुमारास घडली.एकमेकास लागून असलेल्या पत्रा, लाकडाच्या घरांनी काही वेळेतच रौद्ररूप धारण केले. त्यात १५ घरे जळून राख झाली, अशी माहिती नागरिकांकडून देण्यात आली. सर्व घरातील संसारोपयोगी साहित्यासह नवीन कपडे, रोख रक्कम जळून लाखांचे नुकसान झाले.
(Massive fire breaks out at 15 houses in Nashik)

अग्निशामक विभागास माहिती मिळताच लिडींग फायरमन किशोर पाटील यांच्यासह चार अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी घरांना लागून असलेल्या मोकळ्या मैदानातून आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशामक विभागास माहिती देण्यात आली. चार बंबांच्या साह्याने दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशामक विभागास यश आले. आगीत जैनब शहा (एक वर्ष), मुस्कान हसन शहा (२२), जहेद शहा, सदाफ शहा, खुशबू शहा असे पाच जण जखमी झाले आहे.

दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशामक बंब आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने वेळेत आगीवर नियंत्रण मिळाल्याने मोठी दुर्घटना टाळली. त्या आगीच्या कचाट्यात अन्य घरे जळून नुकसान झाले, अशी माहिती पीडितांकडून देण्यात आली. त्यात सोन्याच्या वस्तू तर काहींची रोख रक्कमही जळून नुकसान झाल्याने सर्वजण उघड्यावर पडल्याने त्यांनी एकूणच ठाहो फोडला. मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अग्निशामक विभागाचा १४ ते २० सेवा सप्ताह सुरू होता. यानिमित्ताने मुख्यालयात कार्यक्रम सुरू होता. अशातच भारतनगर येथे आग लागण्याची घटना घडली. तत्काळ चार बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. मोठी आग विझविण्यात अग्निशामक विभागास यश तर आलेच शिवाय या आगीच्या दुर्घटनेने त्यांच्या सेवा सप्ताहाचा समारोप झाला, अशी चर्चा परिसरात रंगली होती.आगीत जळून राख झालेल्या घरांपैकी एका घरात पत्र्याच्या कोठी भरून पैसे तसेच स्टीलचे पातेले आणि छोट्या पत्र्याच्या डब्यात ठेवलेले नोटांचे बंडल अशी लाखांची रक्कम अर्धवट जळालेल्या स्वरूपात नागरिकांना आढळून आली. इतक्या मोठ्या स्वरूपात तेही एका झोपडीत रक्कम असून ती रक्कम आगीत जळून नुकसान झाल्याचे बघताच नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
यांची जळाली घरे

दिलीप सकट, हसन शहा, अनिता राजवाटवणे, विमल घुगे, वीरेंद्र शर्मा, शाहरुख शहा, मुस्कान शहा, भारती गोसावी, मिसबाह शेख, दीपक उगले, रमेश पाटोळे, तौसीफ शहा, बिस्मिल्ला शेख, चंद्रकांत हिरे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी