29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या गणेशवाडीतील महापालिका उद्यानाला अवकळा!

नाशिकच्या गणेशवाडीतील महापालिका उद्यानाला अवकळा!

प्रभाग तीनमधील गणेशवाडी परिसरातील स्मशानभूमी रोडवरील महापालिकेच्या उद्यानास अवकळा आली आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीसह लोखंडी जाळीही भुरट्यांकडून लांबविण्यात आल्याने उद्यानाची नेमकी हद्दच कळेनाशी झाली आहे. खेळणीजवळ मोठ्या प्रमाणावर गवत उगवल्याने बच्चे कंपनीही फिरकेनाशी झाली आहे. उद्यान विभागाच्या दुर्लक्षाने सध्या या उद्यानाचा वापर चक्क गुरे बांधण्यासाठी होत आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप उपमहापौर असताना लाखो रुपये खर्च करून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. पंचवटी विभागात शहराच्या तुलनेत कमी उद्याने आहेत, परंतु पंचवटीतील सर्वात सुंदर उद्यान अशी याची ओळख होती.

प्रभाग तीनमधील गणेशवाडी परिसरातील स्मशानभूमी रोडवरील महापालिकेच्या उद्यानास (municipal park) अवकळा आली आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीसह लोखंडी जाळीही भुरट्यांकडून लांबविण्यात आल्याने उद्यानाची नेमकी हद्दच कळेनाशी झाली आहे. खेळणीजवळ मोठ्या प्रमाणावर गवत उगवल्याने बच्चे कंपनीही फिरकेनाशी झाली आहे. उद्यान विभागाच्या दुर्लक्षाने सध्या या उद्यानाचा वापर चक्क गुरे बांधण्यासाठी होत आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप उपमहापौर असताना लाखो रुपये खर्च करून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. पंचवटी विभागात शहराच्या तुलनेत कमी उद्याने आहेत, परंतु पंचवटीतील सर्वात सुंदर उद्यान अशी याची ओळख होती.(Nashik’s Ganeshwadi municipal park in shambles)

श्री. सानप महापौर असेपर्यंत या उद्यानाची देखभालही व्यवस्थित होत होती. उद्यानाच्या दक्षिणेस पेरूची बाग असून उत्तरेस व पश्‍चिमेस नागरी वस्ती आहे. यात उद्यानाच्या सर्व बाजूंना दगडी भिंत व त्यावर नक्षीदार सुंदर ग्रील्स बसविण्यात आले होते. उत्तरेकडील संरक्षक भिंतीसह दक्षिणेकडील ग्रील्स गायब झाले आहेत, त्यामुळे रस्ता कोणता व उद्यानाची हद्द कोणती हेच समजेनासे झाले आहे. उद्यानाला अवकळा आल्याने त्याकडे कुणीही फिरकत नाही, हेच हेरून या उद्यानाचा ताबा दारूडे, गर्दुल्ले यांनी घेतला आहे. याशिवाय परिसरात ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत, ते चक्क या उद्यानातच जनावरे बांधतात. त्यामुळे उद्यानाला गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोठ्या प्रमाणात सर्प असल्याने, मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने व खेळणीची दुरवस्था झाल्याने बच्चे कंपनीही उद्यानाकडे फिरकत नाहीत. उद्यानाच्या एकूण जागेपैकी तीस टक्के जागेवर समाज मंदिराची व सभागृहाची उभारणी करण्यात आली होती. सुरवातीला या ठिकाणी अनेक सार्वजनिक कार्यक्रमही साजरे होत होते. परंतु या जागेचा खासगी वापर होत असल्याची हरकत घेण्यात आल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोचले. तेव्हापासून या समाजमंदिरासह सभागृह परिसरात व्यसनींचा वावर वाढला आहे.गणेशवाडीतील प्रभाग तीनमधील हे उद्यान पंचवटीतील सर्वांत सुंदर उद्यान होते, परंतु महापालिका प्रशासनाच्या देखभालीअभावी व दुर्लक्षाने त्याला अवकळा प्राप्त झाली आहे.
सुरवातीला या ठिकाणी अनेक सार्वजनिक कार्यक्रमही साजरे होत होते. परंतु या जागेचा खासगी वापर होत असल्याची हरकत घेण्यात आल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोचले. तेव्हापासून या समाजमंदिरासह सभागृह परिसरात व्यसनींचा वावर वाढला आहे.गणेशवाडीतील प्रभाग तीनमधील हे उद्यान पंचवटीतील सर्वांत सुंदर उद्यान होते, परंतु महापालिका प्रशासनाच्या देखभालीअभावी व दुर्लक्षाने त्याला अवकळा प्राप्त झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी