35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमकर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : खाजगी कंपनीचा कर्मचारी अटकेत

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : खाजगी कंपनीचा कर्मचारी अटकेत

 कर्जाचा हप्ता भरण्यासाठीखाजगी कंपनीचा कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नीता श्रावण गुरनुले (वय ४१, रा. म्हाडा कॉलनी, गोदावरीनगर, सातपूर) यांचे पती श्रावण दसरूजी गुरनुले (वय ५०) यांनीखाजगी कंपनी कडून कर्ज घेतले होते.

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी खाजगी कंपनीचा (Private company)  कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या ( suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नीता श्रावण गुरनुले (वय ४१, रा. म्हाडा कॉलनी, गोदावरीनगर, सातपूर) यांचे पती श्रावण दसरूजी गुरनुले (वय ५०) यांनी खाजगी कंपनी कडून कर्ज घेतले होते. त्यांनी सुरुवातीला कर्जाचे हप्ते सुरळीत भरले; मात्र मार्च महिन्याचा हप्ता भरला न गेल्याने आरोपी खाजगी कंपनी व त्यांचा कर्मचारी प्रशांत बोरसे यांनी संगनमत करून गुरनुले यांना वारंवार फोन करून हप्ता भरण्यासाठी तगादा लावला.(One commits suicide over loan installments: Private company employee arrested)

तसेच फोनद्वारे दमदाटी व शिवीगाळ करून “तुम्ही मरा किंवा काहीही करा; परंतु बँकेचा हप्ता भरा,” असे बोलून वसुली कर्मचारी प्रशांत बोरसे याने गुरनुले यांना वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून गुरनुले याने दि. २६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास डीजीपीनगर क्रमांक २ येथील सुवास्तू अपार्टमेंटमधील वॉचमन केबिनमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खाजगी कंपनी व कर्मचारी प्रशांत बोरसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी