27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दारणा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी कोरडेठाक पडले असून दारणा धरणातून दीड महिन्यातून आवर्तन दिले जात असल्याने दारणा काठची गावे विशेषत: भगूर, देवळाली कॅम्पसह नदीच्या काठावर असलेल्या गावांवर पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. (Nashik Water Shortage at Darna dam marathi news)

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दारणा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी कोरडेठाक पडले असून दारणा धरणातून दीड महिन्यातून आवर्तन दिले जात असल्याने दारणा काठची गावे विशेषत: भगूर, देवळाली कॅम्पसह नदीच्या काठावर असलेल्या गावांवर पाणीटंचाईचे सावट (water crisis) उभे ठाकले आहे. (Several villages in Nashik district face drinking water crisis)

दारणा धरणातील पाणी साठ्याची उपलब्धता बघता बघून नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी नोटीस प्रसिद्ध करून भगूरकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे शहराला कमी दाबाने व कमी वेळ पाणी पुरवठा करण्यात येईल. कुणीही पाण्याचा गैरवापर करू नये, पाणी इतरत्र वापरून वाया घालवू नये. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळाला तोट्या लावाव्यात.

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई लक्षात घेत पाण्याचा वापर काळजीपूर्वक, जपून करण्याचे आवाहन भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे तसेच देवळाली छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी केले आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार दिवसाआड किंवा आठवड्यातून काही दिवसच पाणीपुरवठा देवळाली कॅम्पला होण्याची शक्यता आहे.

पाणी जपून वापरावे, ज्यांनी नळांना मोटारी बसवले असतील त्यांनी त्या काढून घ्याव्यात, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे आवाहन केले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांचे नाव तसेच पाटबंधारे विभागाचे रवींद्र सोनवणे यांनी दारणा नदी पात्राची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच नदीपात्राच्या सद्य:स्थितीची पाहणी करून तसेच पाणी साठ्याची पाहणी करून त्याचा अहवाल तयार केला आहे

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई लक्षात घेत पाण्याचा वापर काळजीपूर्वक, जपून करण्याचे आवाहन भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे तसेच देवळाली छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी केले आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार दिवसाआड किंवा आठवड्यातून काही दिवसच पाणीपुरवठा देवळाली कॅम्पला होण्याची शक्यता आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन दारणा नदीपात्राची पाहणी करण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येवू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येवू शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी