क्राईम

विक्रोळी पार्क साइट पोलीस स्टेशन मध्ये महिलांना बेकायदेशीरित्या अटक करून मारहाण करणाऱ्या त्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यात महिलांना बेकायदेशीररित्या अटक करून अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बहुजन क्रांती पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल भाई सोलंकी यांनीकेलीआहेबेकायदेशीरपने विक्रोळी पार्कसाईट पोलीस स्टेशन मध्ये तीन दिवस अटक करून ५पोलीस पुरुष कर्मचारी आणि १ महिला पोलीस कर्मचारी ह्यांनी आमचा शारीरिक व लैंगिक छळ करण्यात आला असुन पोलीसा वरती गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.(Police must be prosecuted fillegally arresting  beating women Vikhroli)

आम्ही नामे साराबाई राम पाखरे व माझी बहीण मालन सुरेश लोंढे दोघी बहिणी वर्षा नगर भीमाशंकर सोसायटी विक्रोळी पार्कसाईट मध्ये ४५ वर्षांपासून राहत असून शनिवारी दिनांक २८ ऑगस्ट२०२१ शनिवारी रोजी मला व तसेच माझी मुलगी सुनीता रवी निर्मल आणि आणखी एक मुलगी नाव

‘सपना संजू गवई ह्यांना रात्री ९ वाजता अटक केली तसेच रात्रभर ५ पुरुष पोलीस कर्मचारी आणि एक महिला पोलीस कर्मचारी ह्यांनी रात्रभर आम्हाला मारहाण केली तसेच हे पोलीस कर्मचारी दारू पिले होते आणि त्यांनी आमच्या गुप्तांगावर देखील मारहाण केली ज्या मुळे माझ्या मनात लज्जा उतपन्न झाली होती तसेच आमच्या बरोबर असणारी मुलगी नामे सपना संजू गवई हिला शारीरिकसुखाची मागणी करीत होते आणि शारीरिक सुख दिले तर तुला सोडून देऊ,  असा प्रकारची मागणीकरीत होते.तसेच संगीता निर्मल ह्यांचा २ वर्षाचा मुलगा आणि सपना संजू गवई हिची ८ वर्षाची८मुलगी सुद्धा पोलीस कोठडी मध्ये ठेवले होते. ताल त्यानंतर त्यांनी २९ ऑगस्ट २०२१ रविवारी रोजी माझी बहीण नामे श्रीमती मालन सुरेश लोंढे

हे सुद्धा वाचा

PUBG च्या प्रभावाखाली अल्पवयीन मुलाने आई, 3 भावंडांची गोळ्या झाडून केली हत्या

Crime : एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह; कांदिवली परिसरात खळबळ

आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या

Crime rate rises on low base effect of pandemic

ह्यांना रात्री १२.३० वाजता अटक केली आणि त्यानंतर रात्रभर आम्हाला मारहाण करून आमचा शारीरिक आणि लैंगिक छळ केला तसेच बाहेर कोणाला सांगितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाहीतसेच खूप खूप अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. एक कर्मचारीगाणी बोलून बोलून आम्हाला मारत होता. सदर मारहाण करत असताना मला तोंडावर एवढी मारहाण केली आहे किमाझा एक दात पडला त्यामुळे मी अत्यंत वेदनेने दुःखी होते.

तसेच मंगळवारी ३१.०८.२०२१ म्हणजेच मंगळवारी माझी मुलगी नाव संगीता रवी निर्मल आणिदुसरी मुलगी नाव सपना संजू गवई ह्यांना मेडिकल करायला चाललोय असे सांगून घेऊन गेले आणित्या नंतर आम्हाला ५०,००० हजार रुपये दे तसेच  नावाचा वकील देतो आणि वकील बरोबरबोलणं करून देतो आणि बोलणं करून दिला. तो तुला सोडवेल आणि पैसे हॉटेल मध्ये देण्याससांगत होते.  वकील खूप चांगला आहे तो तुम्हाला ३ दिवसात सोडवेल दुसरा कुठला वकील करायचा नाही केला तर बेदम मारू अश्या प्रकारचा छळ केला आणि रात्री १२. ३०मंगळवारी आम्हाला सोडून देण्यात आले तसेच ह्या प्रकारची वाच्यता कुठे केली तर आम्ही घरात घुसून मारू अशा प्रकारे धमकी दिली.

 तसेच आम्हाला कसल्याही प्रकारे माननीय न्यायालय पुढे उभे न करता तीन दिवस पोलीस कोठडी मध्ये ठेवून गुलामाचे जीवन जगण्यास भाग पाडले. सदर गुन्हयाचे आरोपी पोलीस कर्मचारीअसल्यामुळे आम्हाला अत्यंत जीवाला भीती वाटत आहे तसेच सदर पोलीस स्टेशन ची वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला असताना देखील आमच्या वरती अश्या प्रकारे अन्याय झाला आहे. सदर गुन्ह्याचेव्याप्ती बघता पोलीस स्टेशन मधील CCTV फुटेज ताब्यात घेण्यात यावेत आणि सदर पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्याच्या वर देखील गुन्हा दाखल करून आम्हाला न्यायदेण्यात यावा अन्यथा आम्ही उपोषणाला बसू आणि ह्या पुढे  आमच्या जीवाला बरे वाईट झाला तर त्याची जबाबदारी शासनाची राहील. असे या महिलांनी सांगितले. संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर महिलांचे वकील अश्विन भागवत यांनी केली आहे

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

काँग्रेसच्या काळात आमच्याकडे खूप विकास झाला, नरेंद्र मोदींचा काळ अत्यंत वाईट

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता  होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

25 mins ago

दाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court…

60 mins ago

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

3 hours ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

3 hours ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

4 hours ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

21 hours ago