33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांना फडणवीस, मुनगंटीवार यांच्याकडून कानपिचक्या

गोपीचंद पडळकरांना फडणवीस, मुनगंटीवार यांच्याकडून कानपिचक्या

टीम लय भारी

मुंबई :  आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. परंतु पडळकर यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार ( Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar slams to Gopichand Padalkar ) या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उपदेशाचा डोस पाजला आहे.

गोपीचंद पडळकरांनी भावनेच्या भरात हे वक्तव्य केले असेल. पवारांसारख्या नेत्यांबद्दल असे वक्तव्य करणे अयोग्य आहे. पवार हे आपले विरोधक आहेत. ते काही शत्रू नाहीत ( Devendra Fadanvis says, Sharad Pawar is our oppenant, but not enemy ). विरोधी मत व्यक्त करण्यात काही गैर नाही. परंतु त्यासाठी योग्य शब्दांचा वापर केला पाहीजे अशा शब्दांत फडणवीस यांनी पडळकर यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Mahavikas Aghadi

याबाबत माझे गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण ते देतील, असेही फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गोपीचंद पडळकरांवर धनंजय मुंडेंनी साधला निशाणा, पवारांवरील टीकेचा घेतला समाचार

आनंदवार्ता! महावितरणातील ७ हजार जागा आठ दिवसांत भरणार

शरद पवार हे मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदी सुद्धा पवारांचा आदर करतात असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शरद पवारच काय पण अन्य कोणत्याही छोट्या मोठ्या नेत्यांवर, सामान्य व्यक्तींवरही अशा शब्दांत टीका करू नये. भाजपची ही संस्कृती नाही. गोपीचंद पडळकर जे बोलले ते चुकीचेच आहे. त्याचे समर्थन भाजप कधीही करणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीने हाणले जोडे

शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका ( NCP agitated against Gopichand Padalkar ) घेतली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून यावेळी आंदोलन करण्यात आले. ‘मी देवेंद्र फडणवीस यांचा मुर्ख गुलाम’ असे लिहिलेली पडळकर यांची प्रतिमा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जोडे हाणले. त्यानंतर प्रतिमा जाळण्यात आली.

गोपीचंद पडळकर हे सडक्या मेंदूचे

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पक्ष बदलण्याचा अनुभव असलेल्या गोपीचंद पडळकरांनी आता धर्मांध पक्षात प्रवेश केला आहे. ते सडक्या मेंदूचे आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

हे तर छिछोरचंद

भाजपने गोपीचंद पडळकर यांना का आमदार बनविले आहे हे आज महाराष्ट्राला समजले. हा गोपीचंद नव्हे, तर छिछोरचंद आहे. भाजपच्या दारात गळ्यात पट्टा घालून भुंकणाऱ्याला महाराष्ट्र दाद देणार नाही अशी टीका रविकांत वरपे यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी