31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसाच्या वक्तव्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो: रोहित पवार

देवेंद्र फडणवीसाच्या वक्तव्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो: रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात मोफत कोरोना लस देण्याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे (Devendra Fadnavis has targeted the government).

“मोफत लसीकरणाबाबतची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. तरीही मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठले धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. फडणवीस यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांचे ते विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे (MLA Rohit Pawar has said that his statement is wrong).

महाविकास आघाडी संकटात राजकारण करत नाही ; संजय राऊतांचा भाजपला टोला

मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. परंतु, आदित्य ठाकरेंनी मोफत लस देण्यासंदर्भातील ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांनी मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. मुंबईतील अंधेरीमध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले (Devendra Fadnavis inaugurated the Covid Care Center in Andheri). त्यावेळी, बोलताना फडणवीस यांनी, लसीचा भार राज्य सरकारवर असणार नसल्याचे सांगितले. त्यावरुन, रोहित पवार यांनी फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे म्हटले आहे.

मोफत लस देण्याबाबत अद्याप निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे वाढला संभ्रम

”सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी ‘केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही’, असे माध्यमांशी बोलताना आपले वक्तव्य ऐकले. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचे वक्तव्य झाले असावे. पण यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

मोफत लसीकरणाबाबत फडणवीस म्हणतात

मोफत लसीकरणाविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की (When asked about free vaccination, Devendra Fadnavis said), “मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहेत प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. प्रत्येक भारतीयाकरता केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे आणि त्यातून ही लस उपलब्ध होणार आहे. मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठले धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे.”

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी