33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रDr.Ambedkar : पूर्ण देश चालविण्याची क्षमता असलेला एकमेव महापुरूष

Dr.Ambedkar : पूर्ण देश चालविण्याची क्षमता असलेला एकमेव महापुरूष

डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( Dr.Ambedkar ) !

महाप्रचंड प्रज्ञा, महाप्रचंड आवाका आणि महाप्रचंड जिद्द असलेला महामानव ! जन्मजात लाभलेली प्रतिभा आणि परिश्रमाने कमावलेली विद्वत्ता यांच्या बळावर धुळीतला माणूस शिखरावर कसा जाऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण ( Dr.Ambedkar ) !

Dr.Ambedkar
डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा ग्रंथ

अर्थशास्त्र , राज्यशास्त्र, समाजशास्त्र , मानववंशशास्त्र, कृषिशास्त्र, धर्मशास्त्र, घटनाशास्त्र अशा असंख्य  क्षेत्रातला महापंडित ! हा माणूस एकटा भारताचे सरकार चालवू शकतो अशी मित्रांचीच नव्हे, तर विरोधकांचीही खात्री ! संविधान, रिझर्व्ह बँक, चलनव्यवस्था, नियोजन आयोग, वित्त आयोग, निवडणूक आयोग ही पायाभूत राष्ट्रयंत्रणा उभी करण्यात सिंहाचा वाटा !

हिराकूड – दामोदर – भाक्रानांगल यासारखी अवाढव्य धरणं, भारतभरातील नद्या जोडण्याचा कार्यक्रम, राज्या राज्यातली वीज मंडळ आणि देशाच्या मध्यवर्ती वीज ग्रीडची स्थापना, कामगारांच्या आणि स्त्रियांच्या कल्याणाच्या सर्व योजनांचा प्रणेता, हिंदू कोड बिल मांडून स्त्री – पुरुष समतेसाठी तमाम धर्ममार्तंडांचा आणि प्रस्थापितांचा रोष पत्करणारा योद्धा ( Dr.Ambedkar ) !

Coronavirus

दलित – शोषितांचा गगनभेदी आवाज ! देशाला पुन्हा एकदा त्याचा गौतम बुद्ध नावाचा सर्वोत्तम पूर्वज आणि सर्वोच्च आयकॉन दाखवून भारतीयांना बोट धरून बुद्धिझम नावाच्या मेनस्ट्रीमकडे नेणारा युगप्रवर्तक ( Dr.Ambedkar ) ! संस्कृतीकार !  राष्ट्रासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा आणि राष्ट्रनिर्माता हे विशेषण सार्थपणे सिद्ध करणारा उत्तुंग राष्ट्रनेता ( Dr.Ambedkar ) !

न्याय,  स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कर्ता ! एका ग्रंथात न मावणारा हा बहुपैलू महामानव ग्रंथात पकडण्याचा केलेला हा एक प्रयत्न ! महामानवाला केलेले एक महाअभिवादन  !

जयभीम

जय महाराष्ट्र

जय भारत

जय जगत

अ‍ॅड. विश्वास काश्यप, मुंबई

हे सुद्धा वाचा

Covid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला संबोधित करावे’

Dr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी टपलेत’

आंबेडकरांचे लंडन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी