32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रPolice : ‘पोलिसांचे पगार 6 महिन्यांसाठी दुप्पट करा’

Police : ‘पोलिसांचे पगार 6 महिन्यांसाठी दुप्पट करा’

वृषाली काश्यप (पुणे शहर)

 

आम्हाला पोलिसांचे ( Importance of Police ) महत्व कधीही समजून येत नाही. आम्ही त्यांना नेहमीच नावे ठेवतो. त्यांना बदनाम करतो. त्यांना बदनाम करण्याचे एकच हत्यार आहे आमच्याकडे आणि ते म्हणजे पोलीस ( Police ) पैसे खातात. मी म्हणते कोणत्या खात्यात आणि क्षेत्रात पैसे खाल्ले जात नाहीत ? मी या ठिकाणी पैसे खाण्याचे समर्थन करीत नाही. परंतु पोलिसांना आम्ही फारच बदनाम करतो.

शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार, वैद्यकीय क्षेत्रात महाप्रचंड भ्रष्टाचार. महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते… किती किती नावे घ्यायची. त्या मानाने पोलीस खात्यात अतिशय कमी भ्रष्टाचार ( Low corruption in Police department ) आहे.

आज हे सर्व लिहावयाचे कारण म्हणजे आज रस्त्यावर आम्ही पोलिसांना ( Police in different role ) वेगळ्या भूमिकेत पाहात आहोत. पोलिसांना आम्ही दररोजच पाहतो. परंतु आम्ही आज त्यांना आमच्या घराच्या दारातून, खिडकीतून, बाल्कनीतून पाहत आहोत. त्यावेळी त्यांच्याबद्दल मनात आदरभाव वाढत आहेच. परंतु त्यांच्या बद्दल एक सखोल विचार सुद्धा करावा वाटतो आहे.

त्यांनाही आमच्या सारखंच कुटुंब आहे. ते सुद्धा कोणाचे भाऊ, पती, बहिण, मामा, काका आहेत. पोलीस ( Police have relatives ) त्यांच्या कुटुंबाला मागे सोडून आमच्यासाठी… हो फक्त आमच्यासाठी, आमच्या भल्यासाठी आज रस्त्यावर उभा आहे. आमचा जीव वाचविण्यासाठी त्यांचा जीव ते धोक्यात घालत आहेत.

आमची सरकारला नम्र विनंती आहे की, पोलिसांचे ( Police’s salary must be double for six months ) पगार किमान सहा महिने तरी दुप्पट करा. सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे हे माहीत असून सुद्धा आमचे सरकारला सांगणे आहे की, या तरतूदीसाठी सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे,  काही हरकत नाही. केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मागा.

एक महत्वाचा संदेश जाणे गरजेचे आहे की, सरकार पोलिसांची काळजी घेत आहे. त्यांच्या कामाचा योग्य तो सन्मान राखला जात आहे.

जयहिंद.

हे सुद्धा वाचा

Dr.Ambedkar : पूर्ण देश चालविण्याची क्षमता असलेला एकमेव महापुरूष

Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुखांची तंबी, ‘सोशल मीडियाचा गैरवापर कराल तर याद राखा’

हेल्थ वर्करच्या मृत्यूला खोटेपणाने जोडले मुस्लिम समूदायाशी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी