31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeसंपादकीयCovid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला...

Covid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला संबोधित करावे’

आयुष्यमान नरेंद्रजी मोदी साहेब,

प्रधानमंत्री,

भारत सरकार

महोदय,

कोरोना ( Covid19 ) या जागतिक महामारीशी आपण देत असलेल्या लढ्याबद्दल आपले प्रथमतः अभिनंदन.

आपण आपल्या स्टाईलने देत असलेल्या लढ्याला सर्व भारतीय साथ देत आहेत. आपल्यावरचा हा एक प्रकारचा विश्वासच आहे.

आपण जाणताच की, १४ एप्रिल ह्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. दरवर्षी ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात देश विदेशात साजरी होते. विशेषतः महाराष्ट्रात भीम जयंती ही १४ एप्रिल नंतर पुढे दोन ते अडीच महिने साजरी केली जाते.

सध्या देशात असलेल्या ( Covid19 ) लॉकडाऊन मुळे आम्ही सर्वांनी असा एकमुखी निर्णय घेतला आहे की, ह्यावेळेस बाबासाहेबांची जयंती घरात राहूनच साजरी करायची.

आमची आपणास नम्र विनंती आहे की, येणाऱ्या १२ एप्रिल रोजी आपण रात्री ठीक ०८:०० वाजता राष्ट्राला संबोधित करून देशाने आणि आंबेडकरवादी जनतेने ह्या वेळची बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी ह्याविषयी मार्गदर्शन करावे.

आपण केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे संपूर्ण भारत देश ती साजरी करेल. बाबासाहेबाना ती एक प्रकारची ऐतिहासिक आदरांजली ठरेल .

आपण प्रखर आंबेडकरवादी आहात. बाबासाहेबांचे निस्सीम चाहते आहात. संविधानासमोर माथा टेकवून आपण आपल्या प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्या विश्वासावरच आपल्याला हे एक नम्र आवाहन आम्हाला करावेसे वाटते.

आपण ही सुवर्णसंधी सोडणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद !

जयभीम

नमो बुद्धाय

जय भारत

आपला विश्वासू,

अ‍ॅड. विश्वास काश्यप,

अध्यक्ष,

मी बुद्धिस्ट फौंडेशन, मुंबई

आणखी बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : उद्धव ठाकरेंना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, बाळासाहेबांच्या पिल्ल्या… वाटलं नव्हतं, तू एवढ्या खंबीरपणे काम करशील

जामखेडमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत

WHO ने प्रसारित केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी