31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयRajesh Tope : मुंबईतील लॉकडाऊन आता अधिक कडक, एसआरपीएफचे जवान तैनात करणार

Rajesh Tope : मुंबईतील लॉकडाऊन आता अधिक कडक, एसआरपीएफचे जवान तैनात करणार

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही निश्चितच चिंता करण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. त्यासाठी संवेदनशील भागात राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) जवान तैनात केले जातील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी दिली आहे.

मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची टोपे ( Rajesh Tope ) म्हणाले.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यंमत्री ( Rajesh Tope ) म्हणाले की, मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुंबईचे लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत त्यांनी त्यांची निरीक्षणी मांडली आहेत. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत.

टोपे ( Rajesh Tope ) पुढे म्हणाले की, गर्दीचे संनियंत्रण महत्वाचे असून आता त्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर  लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय झाला आहे. सीसीसीटिव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक कडक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

धारावीसारख्या दटीवाटीच्या ठिकाणी जे सार्वजनिक स्वचछतागृहे आणि शौचालये आहेत त्याचा वापर दिवसभरात मोठ्या प्रमाणावर होतो अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वच्छ केली जाणार आहेत. ड्रोनचा वापर करून निर्जुतकीरणासाठी फवारणी करण्याचे काम करावे अशीही चर्चा यावेळी झाल्याचे ते ( Rajesh Tope ) म्हणाले.

मुंबईतील गर्दीच्या भागातील नागरिकांना शासनाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तयार अन्न घरपोच देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अगदी छोट्या खोलीत जास्त संख्येने लोक राहतात. त्यामुळेही काही लोक रस्त्यावर दिसतात अशा लोकांसाठी त्या भागातील शाळा उपलब्ध करून दिल्या जातील. तेथे सामाजिक अंतर पाळून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याते ते ( Rajesh Tope ) म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Covid19 : उद्धव ठाकरेंना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, बाळासाहेबांच्या पिल्ल्या… वाटलं नव्हतं, तू एवढ्या खंबीरपणे काम करशील

Covid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला संबोधित करावे’

Covid19 : उद्धव ठाकरेंच्या ट्विटवर हृतिक रोशन, सोनम कपूर, परिणीती चोप्राने व्यक्त केली भावना, अंधभक्ताने त्यांनाही ठरविले ‘विकाऊ’

पाकिस्तानातील व्हिडीओ दिल्लीतील तबलिघींच्या माथी मारला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी