संपादकीय

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा इमानी बाणा

महादेव जानकर ( Mahadev Jankar) हे बहुजन नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी मंत्री व एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण तरीही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आमदारकी, मंत्रीपदे मिळाल्यानंतर पुढाऱ्यांना त्याची चटक लागते. परंतु मंत्रीपद, आमदारकी गेल्यानंतर ती मिळविण्यासाठी जानकर यांनी कुणाचेही लांगूलचालन केले नाही. नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारमध्ये पदे मिळावीत म्हणून अनेक पुढारी प्रयत्न करीत आहेत. महादेव जानकर यांनी मात्र आपले इमान शाबूत राखले आहे. फडणवीस यांच्याकडे नाक घासत जायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा अठरा पगड जातीचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे जानकर यांची विचारसरणी ही भाजपशी मेळ खाणारी नाही. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमाखातर महादेव जानकर यांनी सन २०१४ मध्ये भाजपसोबत हातमिळवणी केली होती. जानकर यांनी त्यावेळी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना निसटते यश मिळाले होते.

महादेव जानकर यांची ताकद त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राला दिसली होती. एवढेच नव्हे तर, महादेव जानकर यांच्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला. अनेक मतदारसंघात ओबीसींची, आणि विशेषतः धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात मिळाली.

हे सुद्धा वाचा

महादेव जानकर भाजपसोबतचा संसार मोडण्याच्या तयारीत

महादेव जानकर यांच्या एका निर्णयाने 432 जणांच्या घरी दिवाळी साजरी

…तर महादेव जानकर मेंढरं राखायला गेला असता; जानकरांचा दावा

दुर्दैवाने सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. परिणामी महाराष्ट्र भाजपच्या सगळ्या चाव्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आल्या. महादेव जानकर यांच्याविषयी फडणवीस यांना फार ममत्व नव्हते. परंतु जानकरांमुळे भाजपला फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपने त्यांची जाणीव ठेवली पाहीजे, असा जनमाणसांचा दबाव फडणवीस यांच्यावर होता. त्यामुळे जानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी, आणि नंतर मंत्रीपद मिळाले. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष भाजपात विलीन करावा, असा त्यांच्यावर दबाव होता. विधानपरिषदेची आमदारकी सुद्धा भाजपकडून घेतली जावी, असाही त्यांच्यावर दबाव होता. पण त्यांनी तो झुगारून लावला.

पुढे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मित्र पक्ष असतानाही त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांना त्यांच्या गोटात ओढले. निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला काही जागा देतो असे सांगितले. पण प्रत्यक्षात उमेदवारांना भाजपचे तिकीट दिले. राहूल कुल या आमदाराला फडणवीस यांनी अक्षरशः लाल गाजर दाखवून पळवून नेले.

दुसऱ्या बाजूला महादेव जानकर यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले. खरेतर बहुजन समाजातील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे लोटांगण घातले आहे. आपल्या निष्ठा फडणविसांच्या चरणी अर्पण केल्या आहेत. फडणवीस यांच्या तालावर ते नाचतात. आमदारकी, मंत्रीपद मिळावे म्हणून ते फडणवीस यांच्यासोबत वाट्टेल ती तडजोड करायला तयार होतात. पण गढुळ झालेल्या या राजकारणात महादेव जानकर यांनी मात्र आपले इमान शाबूत ठेवले आहे.

सध्या मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेकजण फडणविसांच्या सागर बंगल्यावर टाचा घासताना दिसत आहेत. पण महादेव जानकर तिकडे फिरकलेले सुद्धा नाहीत. ‘झाले गेले विसरून जा’ अशी भूमिका घेण्याची चापलूशी त्यांनी दाखविलेली नाही. ‘दोन हाणा, पण मला तुमचा म्हणा’ अशा काकुळतीला ते आलेले नाहीत.

काहीतरी पदरात पडावे म्हणून अनेक नेते मुंबईत ठाण मांडून बसलेले आहेत. महादेव जानकर मात्र ग्रामीण भागात गोरगरीबांच्या घरी भेटीगाठी करण्यात व्यस्त आहेत. सामान्य लोकांनाही जानकर यांचा हा इमानी बाणा भावल्याचे दिसत आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

39 mins ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

2 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

3 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

4 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

4 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

5 hours ago