संपादकीय

डरो मत : राहुल गांधी माफी मागणार तर नाहीच, परंतु पेन्शन सुद्धा घेणार नाहीत!

“सर्व चोरांचे आडनाव मोदी आहे” अशी टिपणी कर्नाटकात २०१८-१९ मध्ये एका सार्वजनिक सभेत राहुल गांधींनी केली होती. या वक्तव्यावर सुरत-पश्चिम येथील भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. सुरत येथील न्यायालयाने त्यांना भारतीय दंड विधान कलम 499 आणि 500 अंतर्गत दोषी ठरवून जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. या कलमांच्या अंतर्गत दंडाची सुद्धा शिक्षा देता येते बरं का. परंतु जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा दिल्याशिवाय यांचा हेतू साध्य होणारच नव्हता.

लोकसभा अध्यक्ष ….
“न्यायप्रिय” असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी तात्काळ रद्द केली. या बिर्ला महाशयांना जेव्हा आम्ही टीव्हीवर पाहतो तेव्हा ‘मुह मे राम और बगल छुरी’ असेच त्यांचे वागणे, बोलणे असते. मोदी, शहाचे गुलाम असल्यासारखेच ते कर्तव्य बजावत असतात. अशा लोकसभा अध्यक्षाकडून न्याय मिळणे म्हणजे दह्याचे पुन्हा दूध करण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट आहे.

खुनशी स्वभावाची जोडी …
आम्ही सर्वसामान्य काय करतोय की फक्त या चंगू मंगूलाच दोषी ठरवतोय. ही जोडगोळी खुनशी स्वभावाची आहेच. हे दोघे तर कटकारस्थान रचण्यात महामेरू आहेत. परंतु त्यांना मदत करणारे तथाकथित स्वायत्त संस्थेचे प्रमुख म्हणून जी काही पदे आहेत त्यावर काम करणाऱ्या लोकांवर आम्ही भाष्यच करत नाही आहोत. खरे तर त्यांनाही आम्ही झोडले पाहिजे.

उघड उघड पक्षपाती निर्णय घेणारा निवडणूक आयोग
मागे शिवसेनेच्या बाबतीत निर्णय दिलेले निवडणूक आयुक्त . सत्तेचे गुलाम कुठले . उघड उघड पक्षपात करून निर्णय देणारी ही मंडळी करोडो लोकांना मूर्ख समजतात की काय ? यांना जनतेचे भय राहिले आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे . जनता षंढ आहे यावर त्यांची 100% खात्री झाली आहे म्हणून त्यांचा उन्माद , माज आणि चरबी वाढली आहे का?

ईडी, सीबीआय लाचार पोपट
ईडी , सीबीआय लाचार पोपटासारखे वागणार आणि आम्ही षंढासारखे गप्प बसणार ? चालणार नाही . त्यांना प्रश्न विचारावेच लागणार. त्यासाठी आम्हाला किंमत द्यावी लागली तरी त्याची तयारी आम्हाला ठेवावी लागेल.

लोकशाहीसाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी आमच्या मुलाबाळांसाठी

राहुलचा खटला …
आत्ताही राहुल गांधींचे प्रकरण बघा. राहुल गांधी यांनी कर्नाटकात 2018-19 मध्ये एका सार्वजनिक ठिकाणी भाषण केले. त्यात सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे आहे असे म्हणाले. त्यावरून गुजरात मध्ये खटला दाखल केला गेला. ज्याला उद्देशून राहुल गांधी बोलले त्यापैकी एकानेही हा खटला दाखल केला नाही. तर दुसऱ्याच कुणीतरी तो दाखल केला. सुरत मधील ज्या कोर्टात खटला चालू होता त्या कोर्टातील न्यायाधीशांवर फिर्यादीचा विश्वास नव्हता म्हणून तो उच्च न्यायालयात गेला. तिथे रिट याचिका दाखल करून खटल्याला स्थगिती मिळून घेतली. सुरुवातीला ज्या न्यायाधीशांपुढे खटला चालू होता, त्या न्यायाधीशांची बदली होताच तो तक्रारदार पुन्हा उच्च न्यायालयात गेला आणि त्याने दाखल केलेली याचिका मागे घेतली. त्या तक्रारदाराला हवा तो न्यायाधीश आल्यावर त्याने खटला पुन्हा चालू केला आणि आपल्याला हवा तसा निकाल लावून घेतला. या खटल्यात न्यायाधीशाने संपूर्णपणे कायद्याच्या तत्वाचे उल्लंघन केले आहे हे उघड उघड दिसत आहे.

कॉपी करून पास झालेले न्यायाधीश ?
परीक्षेत कॉपी करून पास झालेल्या असल्या न्यायाधीशाचं करायचं काय ? अशा न्यायाधीशांना संबंधित खटल्यात कोणता निकाल द्यायचा त्याबाबतची ऑर्डर्स टाईप करून दिली जात असावी आणि त्यावर ते फक्त सही करण्याचे आणि शिक्का उमटविण्याचे काम करीत असावेत अशीच दाट शंका येण्यासारखी परिस्थिती उघड उघड दिसते.

निवृत्त झाल्यावर आशाळभूत नजरेने सरकारकडे पाहणारे न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिटायर झाल्यावर खासदार, राज्यपाल, कुठल्यातरी आयोगाचा अध्यक्ष होण्यासाठी किती लाचारी आणि स्वाभिमान शून्य व्यवहार करतात हे आम्ही पाहतच आहोत.

झाडूवाले स्वाभिमानी
अरे आमच्या सोसायटीतील झाडूवाले तरी बरे. ते स्वाभिमानी असतात. सोसायटीच्या परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाला लागलेला आंबा ते न विचारता कधी तोडत सुद्धा नाहीत. इतके ते स्वाभिमानी असतात.

भ्रष्ट रंजन गोगोई
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावर म्हणजे रंजन गोगोईवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्या महाभागाने त्या आरोपाची स्वतःच चौकशी केली आणि स्वतःला निर्दोष मुक्त केले. काय यांची लायकी बघा. काय दिवसांनी तो राज्यसभेचा खासदार झाला. आता तो तोंड वर करून राज्यसभेत जाऊन बसतो. असल्या लोकांबद्दल आदराने बोलणे म्हणजे आपण षंढ असल्याचे सिद्ध होत नाही का?

जामीन का नाही ?
आता ते ईडी, सीबीआयच्या कोर्टातील न्यायाधीश सर्व तपास झाल्यावर सुद्धा आरोपीला जामीन का देत नाहीत ? त्या आरोपीचं काय लोणचं घालायचेय तुम्हाला ? असला कोणता तपास ही पोपट मंडळी करतात हो ? आरोपीशी संबंधित तपास संपला तर त्याला जामीन मिळालाच पाहिजे. तुमच्या घरचे कायदे आहेत काय ?

नवाब मालिकांना जामीन का नाही ?
नवाब मलिकांच्या केसमध्ये तपास करण्याचे अजून काय राहिले आहे ? त्यांना जामीन का दिला जात नाही ? ते मुस्लिम आहेत म्हणून का ? आम्हाला तर वाटतं या न्यायाधीशांचे अधिकारच कमी केले पाहिजेत. अमर्याद अधिकार देऊन ठेवलेत त्यांना. ज्या अधिकारांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर चालू आहे.

आदरणीय चंद्रचूड सर …
सध्याच्या न्यायाधीशांमध्ये आदरणीय धनंजय चंद्रचूड सर आणि इतर दोन तीन आदरणीय न्यायाधीश यांच्याकडूनच फार मोठ्या अपेक्षा आहेत.

दरोडेखोर गौतम अदानी …
या सर्व भानगडीत तो दरोडेखोर गौतम अदानी राहिला बाजूला . ना त्याची चौकशी ना त्याचा जबाब. ना ईडी, ना सीबीआय, ना सेबी. अर्धा भारत विकत घेऊन सुद्धा नामानिराळे कसा राहू शकतो हा दरोडेखोर ?

स्यू मोटो का वापरला नाही ?…
एकाही न्यायाधीशाला वाटले नाही की आपण या सगळ्या प्रकरणात suo moto ( म्हणजे न्यायालयाने स्वतः होऊन दखल घेणे ) दाखल करून घ्यावा आणि सरकारला जाब विचारावा ?
ऐतिहासिक चूक…
राहुल गांधींची खासदारकी रद्द करून मोदी-शहा या जोडीने संपूर्ण सरकारी पोपटांचा वापर करून ऐतिहासिक चूक केली आहे .
मोदी समाज ओबीसी की संघी…
आता राहुलला काउंटर करण्यासाठी मोदी हे आडनाव “ओबीसी” असल्याचे सांगत आहेत . मोदी ही जमात जरी ओबीसी असली तरी त्यातील बरेचसे कट्टर संघी आहेत बरं.
खोकेवाला कडू…
त्या आमदार बच्चूभाई कडूला दोन वर्षाची शिक्षा झाली. त्याची आमदारकी शाबूत कारण तो खोकेवाले गटात असल्यामुळे त्याची आमदारकी रद्द होणार नाही. वाह रे फडणवीस सरकार.

२३ जुगारी मोदी ….
आजच एक बातमी वाचली. खरी की खोटी माहित नाही, परंतु सुरतमध्ये जुगार खेळताना 23 लोकांना पोलिसांनी पकडले. त्या सर्वांची नावे मोदी निघाली. राहुल गांधी म्हणाले होते की, सारे चोरोंके सरनेम मोदी क्यू है ? परंतु ते सारे मोदी चोर है असे म्हणाले नव्हते.

अपिलात जिंकलात तरी लोकसभेत जाऊ नका…
राहुलजी हा निकाल एकदम फालतू आणि बेकायदेशीर आहे. अपिलात तुम्ही जिंकणारच आहात. तुम्ही जिंकलात तरी 2024 ची निवडणूक होईपर्यंत तुम्ही लोकसभेत जाऊ नका. यांना 2024 मध्ये निवडणुकीत हरवूनच तुम्ही लोकसभेत जा.

चौकीदार ही चोर है …
राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे “चौकीदार ही चोर है” हे दिवसेंदिवस सत्य होताना दिसत आहे.

तथाकथित चौथा स्तंभ..
लोकशाहीचा तथाकथित चौथा स्तंभ मीडिया आणि वर्तमानपत्रे यांच्याबद्दल न लिहिलेच बरे. इतकी त्यांची अवस्था खालच्या पातळीवर गेली आहे. लाखोंचे पॅकेज घेणारी मीडिया मंडळी आणि करोडो रुपयांच्या जाहिराती घेणारी वृत्तपत्रे. नुसता धंदा चाललाय यांचा. स्वतःची घरं भरून पुढच्या पिढीचा सत्यानाश करून वर शहाणपणा शिकवायला मोकळे. राहुल गांधी माफी मागणार तर नाहीच परंतु पेन्शन सुद्धा घेणार नाहीत.
डरो मत !
डरो मत !!
डरो मत !!!

  • ऍड. विश्वास काश्यप ( लेखक माजी पोलीस अधिकारी आहेत)

हे सुद्धा वाचा 
एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायकांची मुंबईत बदली..!
शिंदे-फडणवीसांची ‘सावरकर गौरवयात्रा’ म्हणजे ‘अदानी बचाओ यात्रा’; राऊतांचा निशाणा
मुंबई मेट्रो 3 च्या कारशेड विरोधात दाव्यावर 3.81 कोटी खर्च

Rahul Gandhi to disqualify MPs, misuse of government agencies by Modi Shah, expectations from CJI Chandrachud

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

6 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

7 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

7 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

7 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

7 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

11 hours ago