व्हिडीओ

संजय शिरसाठ विकृत आमदार : सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

संजय शिरसाठ हे विकृत आमदार आहेत अशा जोरदार शब्दांत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे. महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे ट्विट केल्यानंतर त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. संजय सिरसाठ यांनी महिलांच्या संदर्भाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न केले आहेत. आमदार शिरसाठ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्याकडे केली.

पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडताना सुषमा अंधारे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल होतो. मात्र, विरोधी पक्षांच्या महिलांच्या अब्रूबाबत सरकार इतके बेफिकीर कसे, असा सवाल त्यांनी  केला. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने अंधारे यांनी महिला आयोगाकडे शिरसाठ यांची तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू, असे त्यांनी म्हटले आहे.

 

तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी ट्विट करून तक्रारीची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही, तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आहे. बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी ही भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

 

हे सुद्धा वाचा : 

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार
ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे – संजय शिरसाठ
राज्यात मुका घ्या मुका सिनेमा चालू आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

 

छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेच्या सभेत अंधारे यांच्यावर टीका करताना शिरसाठ यांचा तोल सुटला होता. ते म्हणाले होते, “सगळेच माझे भाऊ आहेत, असे ती बाई म्हणते. सत्तार माझे भाऊच आहेत, भुमरेही माझे भाऊच आहेत; पण तिने केलेली लफडी तिलाच माहीत. मुळात ही आहे तरी कोण? आम्ही आमच्या आयुष्याची 38  वर्षे शिवसेना पक्षासाठी घालवली. आता ही बाई येऊन आम्हाला मार्गदर्शन करते आणि उरलेले काही लोक टाळ्या वाजवताहेत.”

Sanjay Shirsath perverted MLA, Sushma Andhare attacks Sirsath, Sushma Andhare, Kinky Sanjay Shirsath, Sirsath Dysaesthesia
विक्रांत पाटील

Recent Posts

शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेचे नियम बदल केल्याने पालकांची नाराजी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) ( RTE )प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून मोठा बदल केल्याने आरटीई प्रवेशाकडे…

5 mins ago

काँग्रेसने पंतप्रधान मोदींना विचारले हे सवाल

आज पंतप्रधान मराठवाड्यात येत आहेत आमचे काही त्यांना प्रश्न: 1. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या  झालेल्या दुरवस्थेकडे पंतप्रधानांचे…

31 mins ago

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

कांदा (onions) काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात…

15 hours ago

वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा (Board exams) घेण्यासाठी ‘लॉजिस्टिक्स्‌’वर काम करावे, यासंदर्भात…

18 hours ago

विठ्ठला तूच’ या चित्रपटाच्या, ट्रेलरने वाढविली प्रेक्षकांची उत्सुकता

खरा विठ्ठल तोच असतो जो संकटावेळी मदतीस धावून येत आपली मदत करतो. आपलं रक्षण करतो.…

18 hours ago

कडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा ३९ अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून तापमान वाढत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव सुरु आहेत.…

18 hours ago