32 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरमुंबईएनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायकांची मुंबईत बदली..!

एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायकांची मुंबईत बदली..!

अखेर पोलीस निरीक्षक दया नायक यांची मुंबईत बदली झाली. दया नायक सध्या महाराष्ट्र एटीएसमध्ये पोलिस निरीक्षक होते. गेली अनेक दिवस त्याची मुंबई पोलीस दलात बदली होणार, अशी चर्चा होती. त्यानंतर काल त्यांच्या बदलीचा आदेश निघाला. त्यांना महाराष्ट्र एटीएस मधून मुंबई पोलीस दल अशी बदली दाखवण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक दया नायक हे एनकौंटर स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता पर्यंत 70 पेक्षा जास्त एनकाउंटर केले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांची बदली मुंबई बाहेर करण्यात आली होती. मात्र, ती बदली रद्द करून त्यांना एटीएस मध्ये नियुक्ती देण्यात आली होती. दया नायक सध्या एटीएस मध्ये होते. या काळात त्यांनी अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. गेल्या वर्षी मानसुख हिरेन प्रकरणाचा तपास त्यांनी करून त्याचा दोन दिवसात उलगडा केला होता.या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण एनआयए कडे सोपवण्यात आलं होतं. दया नायक यांनी अनेक मोठ्या कारवाया एटीएस मध्ये केल्या आहेत. यानंतर आता त्यांची बदली मुंबई पोलीस दलात करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती मुंबई क्राइम ब्रांचमध्ये होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:

पोलिस बदल्या : मि. क्लीन गृहमंत्री फडणवीस पुन्हा तोंडघशी

IAS Transfer : आयएएस डॉ. निधी पांडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली

केवायसी फ्रॉड पासून सावध रहा; सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी