34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीय'या' रागामुळे राजगुरुनीं सोडले घर आणि स्वातंत्र्य लढयात झाले सहभागी

‘या’ रागामुळे राजगुरुनीं सोडले घर आणि स्वातंत्र्य लढयात झाले सहभागी

प्राची ओले: टीम लय भारी

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या राजगुरू(Rajguru)यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे आहे. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी खेड-पुणॆ येथे झाला. हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली. राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती साँडर्सच्या वधाच्या वेळी! (Rajguru who sacrificed his life for the freedom of his country is Shivram Hari Rajguru).

त्यांना 14व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे त्यांच्या मोठ्या भावाने आपल्या नवविवाहित पत्नीसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली होती. हा अपमान त्यांना त्या वयात सहन झाला नाही. त्यांनी त्याच रागात अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले 9 पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या 2 पैशांसह त्यांनी आपले घर सोडले.

जयंत पाटीलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली

पाचगणी येथे माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण

राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा शिकण्यासाठी, लोकमान्य टिळक ग्रंथालयत, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने – वादविवाद ऐकण्यात जात होता. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. साँडर्स नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन लाला लजपत राय मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 17 फेब्रुवारी 1928 रोजी राजगुरू आणि भगतसिंग यांनी लाहोर येथे अधिकारी साँडर्सवर गोळ्या घालून त्यांना ठार केले.

‘आपणासारिखे करिती तात्काळ’ असे चंद्रशेखर आझाद आणि ‘दुजांसारखे होती तात्काळ’ असे राजगुरू, एकत्र आले आणि त्यांचे 36 गुण जुळाले. ह्याच 36 गुणांनी इंग्रज सरकारशी 36चा आकडा घेऊन देशासाठी आहुती दिली. ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यागासाठी ते कायम तयार, आसुसलेले असायचे.

लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जेव्हा कट रचण्यात आला, तेव्हा योजना अशी आखण्यात आली होती की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवणार होते. त्यानंतर भगतसिंग आणि राजगुरू त्यांच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील. परंतु, 4 दिवस स्कॉट बाहेर फिरकलाच नाही. पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी इशाऱ्याने सांगितले की हा नसावा, पण ही नकारात्मक खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी त्या साहेबाच्या दिशेने गोळी झाडली, लगेचच भगतसिहांनी देखील आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडून त्या गोऱ्या साहेबाला पूर्णपणे आडवे केले.

Rajguru
राजगुरुनीं सोडले घर आणि स्वातंत्र्य लढयात झाले सहभागी

तोपर्यंत चौकीतले बाकीचे अधिकारी बाहेर आले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून आला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी कम करत नव्हते. राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून जोरात आपटले, या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील मॅगझिन खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मॅगझिन पटकन उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले होते.

लाला लजपत राय यांचा खुनी, साँडर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी अधिकाऱ्याच्या वेषातून राजकोटला निसटले. राजगुरू, त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, जागृत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून एका गाडीतून पसार झाले. त्यांनी त्यांचा मोर्चा लाहोरहून राजकोट कडे वळवला.

योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले.

साँडर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्‍नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत’ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. राजगुरूंच्या या धैर्याला काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत निर्भयपणे वावरत होते. पण कोणालाही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा इसम इतका मोठा क्रांतिकारक असेल.

कोरोना हृदय सम्राट गप्प का, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

Remembering Mother India’s revolutionary son Shivaram Rajguru on his birth anniversary

अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले. पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार अशा घटना घडल्या. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकाऱ्यांना घेऊन, जबरदस्तीने रबरी नळीने त्यांना दूध पाजण्याचा प्रयत्‍न करत. या पोलिसांच्या वागणुकीमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड शारिरीक त्रास सहन करावा लागला. पण याही स्थितीत ते सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

काही वर्षांनी लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला. शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी