31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांच्या कुटुंबियांच्या मनाचा मोठेपणा, सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या

बाळासाहेब थोरातांच्या कुटुंबियांच्या मनाचा मोठेपणा, सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या

टीम लय भारी

संगमनेर : भारतीय सीमेवर सैनिक अहोरात्र सेवा करत असतात. हे सैनिक ऊन पाऊस कशाची तमा न बाळगता भारताचे संरक्षण करत असतात. या सैनिकांसाठी महसूसल मंत्री बाळासाहेब थोरांत यांच्या कुटुंबियांनी मनाचा मोठेपणा करत सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवल्या आहेत (Balasaheb Thorat family sent troops to the border).

राखी भावाला बांधली जाते कारण भाऊ बहिणीचे रक्षण करतो. परंतु थोरातांच्या कुटुंबियांनी भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सीमेवर राखी पाठवली आहे. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जयहिंद महिला मंचच्या वतीने दरवर्षी प्रमाणे रक्षाबंधनानिमित्त मिठाई आणि राख्या पाठवल्या आहेत.  श्रीनगर मधील बांदीपुर बटालियनच्या सैनिकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी या राख्या हातावर बांधले असून या बद्दल संगमनेर मधील महिलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

रोहित पवार सरसावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, बाळासाहेब थोरातांशी केली चर्चा

बाळासाहेब थोरात यांच्या हातून माता भगिनींना मदतीचा हात

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर बांदीपुर भागात असणाऱ्या सैनिकांना संगमनेर मधून जयहिंद महिला मंचच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2500 राख्या आणि मिठाई पाठवण्यात आली होती. दरवर्षी दीपावली आणि रक्षाबंधना निमित्ताने जयहिंद महिला मंचच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी फराळ आणि राख्या पाठवल्या जातात (Every year on the occasion of Diwali and Rakshabandhan, Jayhind Mahila Manch sends Farals and Rakhis for the soldiers on the border).

या वर्षी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, सैनिक समितीचे प्रकाश कोटकर, रावसाहेब कोटकर यांच्या उपस्थितीमध्ये जय हिंद महिला मंचच्या भगिनींनी राख्या आणि मिठाई पाठविल्या. या राख्या कोलकत्ता, पुणे आणि श्रीनगर येथे पाठवण्यात आल्या होत्या (The rakhs were sent to Kolkata, Pune and Srinagar).

Balasaheb Thorat family sent troops to the border
भारतीय सैनिकांनी झाले रक्षाबंधन साजरे

बाळासाहेब थोरात यांच्यामुळे घुलेवाडी येथे रुग्णालय मंजूर

20-Year Record: Cabinet Minister N Rane Arrested For “Slap Thackeray”

रक्षाबंधनाच्या दिवशी श्रीनगर येथील बांदीपुरा बटालियनमध्ये या राख्या सैनिकांनी हातावर बांधून घेतल्या. संगमनेरमधून पाठवलेली मिठाई सुद्धा सैनिकांनी खाली. यावेळी सैनिकांनी जयहिंद महिला भगिनी प्रती कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे आभार व्यक्त केले आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, आम्ही घरापासून दूर राहतो. अशा वेळेस सुखदुःखात आमची आठवण काढणारे संगमनेरचे पुरोगामी विचार आणि सांस्कृतिक परंपरा अत्यंत अभिमानास्पद आहे. सैनिकांच्या कायम पाठीशी राहणा या महिला भगिनी बद्दल आम्हाला कायम आदर आणि सन्मान आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी कायम देशासाठी मोठे योगदान दिले असून सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांबद्दलचे आत्मीयता इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी या सैनिकांनी आनंद व्यक्त करत सर्व भगिनी प्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच दूरध्वनीद्वारे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याशी संवाद साधून आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी