31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयराखी केवळ भावालाच नव्हे तर, पतीलाही बांधली जाऊ शकते; इतिहासात आहेत आख्यायिका...

राखी केवळ भावालाच नव्हे तर, पतीलाही बांधली जाऊ शकते; इतिहासात आहेत आख्यायिका !

 

मृगा वर्तक : टीम लय भारी

बंधनं कुणाला हवी असतात? बंधनं, शृंखला हे सारं झुगारून देण्यासाठी, तोडून टाकण्यासाठीच असतं. बंधनं लादल्याने मनं संयमित होतात. आणि संयमित मनाची ताकद असामान्य असते. त्यातूनही रेशमी बंध बांधणं म्हणजे नात्यांचे सोहळे असतात. आपल्या भारतात प्रत्येक नात्यांचे सोहळे साजरे केले जातात. त्यातून नाती दृढ होतातच पण त्याचबरोबर प्रेम वाढीस लागतं(rakhi purnima to celebrate on shravan full moon).

रक्षाबंधन हा सण नाही, सोहोळा आहे. परंतु राखी बहिणीनेच भावालाच बांधायची असते याचे काहीही पुरावे संस्कृतीत किंवा पुराणात सापडत नाहीत. भारतातील विविध संस्कृतींचा अभ्यास केल्यास असे समजते की वेगवेगळ्या प्रदेशात रक्षाबंधनाच्या वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यावर किती विश्वास ठेवावा हा मुद्दा गौण परंतु त्यानिमित्ताने विविध संस्कृतींचे आणि तत्कालीन विचारसरणीचे ज्ञान होते.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी बहिणींना रक्षाबंधनच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेचे कोळी बांधवांसाठी असणारे महत्त्व

गोष्ट आहे राजस्थानच्या संग राजाची. त्याच्या राज्यावर आक्रमण झाले आणि त्याची राणी कर्मावती जोहर करण्याची तयारी करत होती. त्यातच गुजरातच्या बहाद्दूर शाहने चितोड वर आक्रमण केले. तेव्हा ना राहवून तिने दिल्लीच्या राजा हुमायून यास रेशमी राखी पाठवून दिली. राजाने तिचा अर्थ समजून आपली सेना पाठवली परंतु उशीर झाला होता आणि राणी जाळून गेली होती.

अजून एक गोष्ट अशी सांगितली जाते की सिकंदर जग जिंकीत झेलम पर्यंत येऊन ठेपला होता, त्यावेळी आपल्यावर संकट येऊ नये म्हणून सावित्री नावाची स्त्री नदीची पूजा करत होती. तेव्हा सावित्रीने सिकंदाराला राखी बांधल्याची कथा सुद्धा उत्तर प्रदेशात सांगितली जाते.

rakhi purnima
रक्षा बंधन

बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे भाऊ-बहिण

सुप्रिया सुळेंनी केले रक्षाबंधन साजरे

युद्धात शत्रूपासून इंद्राचे रक्षण व्हावे म्हणून इंद्रायणीने आपल्या पतीलाच राखी बांधली होती. तसेच यम रात्री अपरात्री उशिरा येत असल्याने यमीने आपलाच भाऊ आणि पती असलेल्या यमाला राखी बांधली होती.

यासाऱ्यातून असे निदर्शनास येते की अबला स्त्री तिचा संपूर्ण विश्वास असलेल्या पुरुषाच्या मनगटाला राखी बांधते. त्यातून त्याने तिचे रक्षण करावे अशी इच्छा अभिप्रेत असते. जेव्हा स्त्री पुरुषासमोर आपले न्यूनत्व मान्य करते आणि सर्वशक्तिमान पुरुषाला आपले रक्षण करण्यास एका रेशमी बंधनाने भाग पडते तेव्हा तिच्यातील व्यवहारी आणि मुत्सद्देगिरी दिसून येते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी