संपादकीय

Shah Rukh Khan Birthday : पडद्यावरच नाही तर रिअर लाईफ मध्ये सुद्धा ‘बादशहा’च!

शाहरूख खान……….!! 90 च्या दशकात दिल्लीतून मायानगरी मुंबईत आलेला एक तरूण, चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत पाय ठेवायला जागा मिळेल की नाही याची देखील त्यावेळी शाश्वती नसलेला हा अभिनयवेडा तरुण केवळ आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर बॉलिवूडचा ‘बादशहा’ झाला. आज या बादशहाचा 57 वा वाढदिवस… खरेतर वय ही त्याची मर्यादा नाहीच… कामाप्रती त्याची असलेली आस्था हीच त्याची आजची ओळख म्हणावी लागेल…. आज त्याचा वाढदिवस साजरा होत असताना त्याच्या या प्रवासाची चर्चाच तुम्हाला ऐकायला मिळेल… केवळ एखादी चुक, एखादे वक्तव्य एखाद्या स्टारचं करिअर धुळीत मिळवते…. शाहरुखला देखील अशी अनेक संकटे या काळात झेलावी लागली; मात्र त्याचा संयम, त्याची अचलवृत्ती त्याला त्याच्या मार्गावरून हटवू शकली नाही.

शाहरुख खानचा आजचा 57 वाढदिवस खरंतर अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा ठरणारा आहे आणि याचे कारणही अगदी तसेच आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून त्याच्यावर संकटांचे सहस्त्रबाण झेपावत असताना देखील त्या वेदना त्याने कधी जाणवू दिल्या नाहीत, माणूस हा मुळात कुटुंबवत्सल प्राणी. कुटुंबावरच जेव्हा अनेक आघात होऊ लागतात तेव्हा माणसाचा विश्वास तुटतो…. तो सैरावैरा होतो. मात्र अशा संकटकाळात देखील तो कुटुंबासाठी एखाद्या पुराणवृक्षासारखा अढळ राहीला. बॉलिवूडचा किंग, रोमान्सचा हिरो, बादशहा… कधीतरी त्याचा जीव आपल्या कुटुंबासाठी तुटला असेल, त्याचा स्वर कातर झाला असेल… पण या सगळ्यावर त्याने मात केली आणि तो पडद्यावरच नव्हे तर रिअल लाईफचा देखील बादशहा असल्याचे त्याने या काळात दाखवून दिले.

गेल्या काही वर्षांपासून ‘बायकॉट’ नावाचा एक अजस्त्र अजगर समाजमाध्यमांतून वावरत आहे. तो अत्यंत विखारी असे फुत्कार टाकत आहे. धार्मिक जातीय व्देशापोटी हा ट्रेंड चालवला जातो. चित्रपट तिकीटबारीवर आपटावा निर्मात्यांचे नुकसान व्हावे अशा हेतूने हा ट्रेंड चालवला जातो. याला देखील गेल्या अनेक वर्षांपासून त्याने तोंड दिले. क्रियेला कोणतीही प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे काही नाही, अशाच पद्धतीने ट्रोलर्सना देखील त्याने कधी भाव दिला नाही.

हे सुद्धा वाचा…

Bacchu Kadu : आमदार बच्चु कडूंची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरूच; मतदार संघाला 500 कोटींचा निधी देणार

Anandacha Shidha : आनंदाचा शिधा न मिळाल्याने ग्राहकांचा रेशन दुकानावर हल्ला

Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

आर्यन खान प्रकरण मात्र त्याच्यासाठी मोठा धक्का होता. अशावेळी सर्वचबाजूंनी काळ आपल्यावर धावतोय अशी परिस्थिती असते. त्यावेळी त्याची एक ‘बाप’ म्हणून दिसलेली छबी मात्र खऱ्या बादशहाचीच होती. हल्ली कोणतेही संकट कोसळले तरी इतरांची सहानुभूती गोळा करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाकडे पर्यायाने बघतात. खरी खोटी बाजू स्वतःच आपापल्या पद्धतीने सांगून मोकळे होतात आणि मीडिया ट्रायलसाठी तयार होत तिथेच आपल्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यात धन्यता मानतात. परंतु त्या उलट शाहरुख खान याचा वेगळाच स्वभाव या काळात पाहायला मिळाला.

जेव्हा आर्यन खान ड्रग्स केसमध्ये अडकला तेव्हा त्या बापाच्या मनाला वेदना नक्कीच झाल्या असतील. मुलगा दोषी आहे, नाही ही वेगळी गोष्ट असली तरीही त्याच्या बाजूने ठामपणे उभं राहणं, आपली मत मांडून मीडिया ट्रायलला उगाचच मुद्दा त्याने दिला नाही. विश्वास, ठामपणा, सत्य – असत्य समजण्याची ताकद, सामाजिक जबाबदारी शाहरुखने निश्चितच उत्तमपणे यावेळी पार पाडली. कोर्टाची लढाई त्याने कोर्टात लढली आणि या संकटातून तो बाहेर पडला. अनेकजण टीका करण्याच इतके व्यस्त राहिले की शाहरुखच्या या वेगळ्या बाजूकडे त्यांचे लक्ष सुद्धा गेले नाही.

या प्रकरणाआधी धर्मावरून अनेकजण शाहरूखला डिवचत राहिले. ‘पाकिस्तानात जा’ म्हणून धमकावत राहिले. परंतु एवढा शब्दांचा मार सहन करून त्यावर सामंजस्याची भूमिका घेत याकडे सपशेल दुर्लक्ष केले. कुटुंब वत्सल असणारा हा गुणी कलाकार अजूनही अनेकांच्या ह्रदयाl मुक्तपणे संचार करीत आहे. वयक्तिक आणि सामाजिक जीवनात बॉलिवूड बादशाह शाहरुख खान नेमका कसा आहे, हे कोड उलगडणं थोडं अवघड आहे, कारण शाहरुख इतरांप्रमाणे कधी उघडपणे बोलणे पसंत करीत नाही त्यामुळे अंदाज बांधणेच कठीण. तरीही अशावेळी बऱ्याचशा गोष्टींमधून त्याचे प्रसंगावधान, समजूदारपणा, आत्मविश्वास हे गुण निश्चितच इतरांपेक्षा त्याला वेगळं ठरवतात हे नक्की!

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

42 mins ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

58 mins ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

1 hour ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

2 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

7 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

9 hours ago