एज्युकेशन

IAS भूषण गगराणी यांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षार्थींना दिल्या टीप्स !

मित्रमैत्रिणीने करिअर निवडले म्हणून तेच करिअर निवडू नये. आंथळेपणाने एखाद्या गोष्टीच्या मागे पडू नका. समुपदेशन घ्या, मार्गदर्शन घ्या. वाचन, अभिव्यक्ती व विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखून करिअरची निवड करा, करिअर निवडताना, वाचन, अभिव्यक्ती व विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखणे गरजेचे असल्याचे (competitive examinees tips) मत मुख्यमंत्र्यांचे अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी (IAS Bhushan Gagrani) यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, गुरुवर्य आनंद दिघे व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर अध्यक्षस्थानी होते. तर शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे व सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे व्यासपीठावर उपस्थित होते. (IAS Bhushan Gagrani guidance, given tips competitive examinees)

ज्ञान आणि शहाणपण या वेगळ्या गोष्टी आहेत. माहितीपासून ज्ञानापर्यतची प्रक्रिया शिकण्यासाठी विषयापलिकडे अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. करिअर निवडताना विचारवंतांचा सल्ला घेणे, चुका न करता व्यवस्थित नियोजन कसे करावे याकडे लक्ष द्यायला हवे. करिअर हे साधन नसून साध्य आहे, हे लक्षात ठेवून करिअर निवडायला हवे. ज्या कारणासाठी करिअर निवडायचे आहे ते कारण कळायवा हवे, शासकीय सेवेत येण्याचे कारण काय ? उद्देश काय ? हे कायम लक्षात ठेवायला हवे. पालकांनी, कुटूंबाने पाल्याच्या मागे खंबीरपणे उभे रहायला हवे, पाल्यांनीही अल्पसंतुष्ट, आत्मसंतुष्ट न राहता पुढे कोणती क्षेत्रे निवडायची आहेत, हे कळणेही महत्वाचे असल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली.

सोशल मिडियामुळे विचार व विकास क्षमतेवर परिणाम !
सोशल मिडियामुळे विचार व विकास क्षमतेवर परिणाम झालेला आहे. विचार करण्याची भाषा विकसित करायल हवी. भाषा सक्षम हवी, अभिव्यक्त होता यायला हवे. ज्ञान भाषा व मातृभाषा यावर प्रभुत्व हवे. १० टक्के मेरीट व ९० टक्के ॲप्लिकेशन हा बॅलन्स जमायला हवा. यासाठी ॲटिट्युड टेस्टची मदत घ्यायला हवी, असेही भूषण गगराणी यावेळी बोलताना म्हणाले.

तोंडावर केलेल्या स्तुतीमुळे आत्मसंतुष्टता येते : आयुक्त अभिजित बांगर
१० वी व युपीएससी प्रमाणेच १२ वी ची परिक्षाही महत्वाची आहे. सिव्हिल सर्विसचा अभ्यास करताना सर्वच परिक्षा सिरियस घ्यायला हव्यात. जुन्या वाईट सवयी जाऊन नव्या चांगल्या सवयी लागत असतात. नोकरीत सेट होणे ही वाईट सवय आहे. पाॅवर, सोशल ॲप्रुअल, तोंडावर केल्या जाणाऱ्या स्तुतीमुळे आत्मसंतुष्टता येते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध रहायला हवे. करिअर निवडताना आनंदी आयुष्य, दिशा स्पष्ट व कशासाठी, कोणासाठी काम करायचे आहे, हे कळायला हवे, यासाठी सर्वांगीण वाचन करायला हवे. दिवसभाराच्या वेळेचे नियोजन करायला हवे. तर करिअर मध्ये नक्किच यश मिळेल, असे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

IAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

IAS डॉ. राजेश देशमुख यांना राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

IAS चंद्रकात दळवी म्हणतात; अर्थसंकल्पात कृषीला न्याय, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष

प्रास्ताविक करताना, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ यांनी सागितले की, आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाची स्थापना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. या महाविद्यालयात प्लेग्रुप पासून ते एलएलएम, पॅरामेडिकल, नर्सिग, फायर फायटिंग, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनिअर कॉलेज पर्यंत सर्वच सेक्शन चालवित आहोत, एक मिशन म्हणून आम्ही सर्वजण काम करीत आहोत.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

11 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

11 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

11 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

12 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

18 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

19 hours ago