31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeएज्युकेशनCoronavirus : दहावीच्या उरलेल्या एका विषयाचीही परीक्षा लांबणीवर

Coronavirus : दहावीच्या उरलेल्या एका विषयाचीही परीक्षा लांबणीवर

Coronvirus मुळे घेतला निर्णय 

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ ( Coronvirus ) रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीच्या भूगोल या एकमेव उरलेल्या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

सोमवारी या एकमेव विषयाची परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा केव्हा होणार याची तारीख ३१ मार्च नंतर जाहीर केली जाईल, असे गायकवाड म्हणाल्या.

पहिली ते आठवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. नववी व अकरावीच्या परीक्षांबाबतचा निर्णय १५ एप्रिलनंतर जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकानुसार होणार होत्या. पण ‘कोराना’ फैलाव वाढू लागला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दहावीचा एकमेव पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षी महिलेला कोरोनाची लागण

Aditya Thackeray यांनी शाहरूख खानचे मानले आभार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी