महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात नवे बदल घडवत आहे. तसेच भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक नेहमी वरती असण्यासाठी सरकारल नेहमी प्रयत्नशील असते. दरम्यान सर्वोकृष्ट विद्यापीठांच्या रॅंकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सहयाद्री अतिथीगृह येथे पार पडली.
बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, ‘रुसा’चे संचालक निपुण विनायक, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.उज्ज्वला चक्रदेव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल जाहीर झाला, असे पाटील म्हणाले. शिक्षण आणि संसाधने, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता ,शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली कल्पना, नवीव संसोधन या मापदंडांवर संस्थांचे मानांकन ठरते. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संस्थांचा क्रमांक यादीत वरचा असावा लागतो.
हे सुध्दा वाचा:
पवारांचे महाराष्ट्राला शांततेचे आवाहन; सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या!
जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भेट
वाचाळवीर निलेश राणेंवर बॅन घाला; भाजपला संजय काकडेंचा घरचा आहेर
महाराष्ट्रातील विद्यापीठ महाविद्यालयांची परिस्थिती आणि सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा,राष्ट्रीय सेवा योजना, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेतला.
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…