27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयवाचाळवीर निलेश राणेंवर बॅन घाला; भाजपला संजय काकडेंचा घरचा आहेर

वाचाळवीर निलेश राणेंवर बॅन घाला; भाजपला संजय काकडेंचा घरचा आहेर

राज्यात सध्या हिंदू-मुस्लीम विेरोधी तणावाचे वातावरण वाढले आहे. संगमनेर, कोल्हापूर येथे दोन गटात वादाच्या ठिणग्या पडल्यानंतर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी पवार हे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातच शरद पवार यांना सोशल मीडियातून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते संजय काकडे यांनी आज पत्रकारपरिषद घेत वाचाळवीर निलेश राणे यांच्यावर पक्षाने बॅन घालावा असे पत्र पक्षाच्या वरिष्ठांना देणार असल्याचे म्हटले.

संजय काकडे काकडे म्हणाले, भाजप हा सास्कृतिक पक्ष आहे. पक्षातील अश वाचाळवीर मंडळींवर भारतीय जनता पक्षाने बंदी आणावी. याबाबत मी पक्षातील वरीष्ठांना पत्र देखील पाठवणार आहे. अशा वाचाळवीरांमुळे काही समाज भारतीय जनता पक्षापासून दूर जावू शकतो एका ज्येष्ठ नेत्याच्या बाबतीत असे वक्तव्य केल्यामुळे पक्षाची प्रतीमा मलिन होऊ शकते. ज्येष्ठ नेत्याच्या बाबतीत असे बोलणे पक्षाचे धोरण नसल्याचे देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रस्त्यावरील 145 मुलां मुलींना मिळणार शिक्षण, फिरत्या पथकाची कामगिरी

युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंतांचा युवा उत्थान फाऊंडेशन करणार गौरव

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर – चॅनेल; काय आहे, कसे काम करते ते जाणून घ्या …

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याच्या विषयावर बोलताना काकडे म्हणाले, पवार यांना अशी धमकी आली असेल तर भाजपचा याच्याशी कोणताही संबंध नाही. ज्या कोणी धमकी दिली असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शरद पवार यांचे कोणीही शत्रू नाही, ज्याने कोणी धमकी देण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्याच्यावर कारवाई केली जाईल. राज्याचे गृहमंत्री सक्षम असल्याचे देखील काकडे यावेळी म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी