28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाजळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भेट

जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भेट

राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांची धडाडीने काम करणारा मंत्री अशी ओळख आहे. राज्यातील खेळाडूंनी चांगल्या सोईसुविधा मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील असतात. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी देखील मंत्री महाजन यांनी महत्त्वाचे काम केले आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट क्रिडापटू घडावेत यासाठी ते प्रोत्साहन देत असतात. जिल्ह्यात उत्तम दर्जाचे विभागीय क्रिडा संकुल उभे रहावे यासाठी त्यांनी मेहरुण येथे तब्बल 36 एकर जागा मंजूर केली आहे.

खेळाडूंना उत्तम सोईसुविधा उपलब्ध असणारे मेहरुण येथे ३६ एकर जागेवर प्रस्तावित विभागीय भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जळगाव तसेच खानदेशातील आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या या विभागीय क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते म्हणाले, या क्रीडा संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या जमीन प्रस्तावास जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्फत मंजुरी देण्यात आली आहे.

खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडूं सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे याभागातील खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील असे महाजन यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

वाचाळवीर निलेश राणेंवर बॅन घाला; भाजपला संजय काकडेंचा घरचा आहेर

रस्त्यावरील 145 मुलां मुलींना मिळणार शिक्षण, फिरत्या पथकाची कामगिरी

युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंतांचा युवा उत्थान फाऊंडेशन करणार गौरव

लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ३६ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदाने, धावपटू साठी ट्रक, बास्केटबॉल, हॉलीबॉल साठी मैदान, टेनिस कोर्ट, आदींसह खेळाडूंना लागणा-या अद्ययावत सोई सुविधांसह तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी