34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनOnline Class : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या सर्वेक्षणात गुंतलेले शिक्षक ऑनलाइन...

Online Class : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या सर्वेक्षणात गुंतलेले शिक्षक ऑनलाइन वर्गाचा अहवाल कधी व कसा देणार?

टीम लय भारी

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत सध्या बहुतांशी शिक्षक घरोघरी जाऊन दिवसभर सर्वेक्षण करण्यात गुंतले आहेत. त्यातच शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्ग (Online Class) कधी घ्यायचे आणि अहवाल कसे द्यायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षक संघटनांनीही शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच (Online Class) पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात गुंतलेल्या शिक्षकांना ऑनलाइन वर्ग कधी घ्यावेत आणि अहवाल कसा द्यावा असा प्रश्न पडला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा भरलेल्या नाहीत. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शिक्षक कोणते माध्यम वापरतात याचा आढावा शिक्षण विभाग घेत असून त्यासाठी शिक्षकांना दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेच्या (एससीईआरटी) संकेतस्थळावर शिक्षकांनी ही माहिती भरायची आहे. ‘शासन परिपत्रकाचा नीट अभ्यास करून त्यानुसार नोंद ठेवण्यात यावी. कोणतीही हयगय करू नये,’ असे संदेश अधिका-यांनी शिक्षकांना पाठवले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी