30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमऔरंगबादेत खासगी कोचिंग क्लासमध्ये मुलींसोबत अश्लील चाळे करणा-या शिक्षकाला बेड्या!

औरंगबादेत खासगी कोचिंग क्लासमध्ये मुलींसोबत अश्लील चाळे करणा-या शिक्षकाला बेड्या!

टीम लय भारी

औरंगाबादः दहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला दामिनी पथकाने बेड्या ठोकल्या(Aurangabad, a teacher molested a student)

या मुलीच्या वडिलांनी सदर शिक्षकाविरोधात छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या माहितीवरून दामिनी पथकाने थेट कोचिंग क्लासमध्ये जाऊन संबंधित शिक्षकावर कारवाई केली.

PM केअर फंडातून महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर खराब अन् बिनकामाचे, विनायक राऊतांचा संसदेत घणाघात

महापरिनिर्वाणदिनी मुंबईकरांनो ऑनलाईन अभिवादन करा, महापौरांचे आवाहन

अमोल रावसाहेब गवळी असे या शिक्षकाचे नाव आहे. छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिजिक्स शिकवताना अश्लीलतेवरच भर!

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणी 15 वर्षीय मुलीच्या पित्याने दामिनी पथकाला फोन करून क्लासचालक वर्गात कशा प्रकारे छेड काढतो, याबद्दल माहिती दिली.

आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला!

Health dept paper leak: One arrested from Aurangabad

ही धक्कादायक माहिती ऐकून उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि चालक गिरीजा आंधळे यांनी पडेगाव गाठले.

त्यांनी आधी मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात घेतले. कुटुंबियांनी त्यांना आपबिती सांगितले. अमोल गवळी मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, फिजिक्स शिकवताना त्यातील अश्लीलतेवर बोलणे, माझ्यासोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही, असे सतत बोलत होता. तसेच मोबाइलवर त्याने अश्लील मेसेजदेखील पाठवले होते.

वेश बदलून दामिनी पथक पोहोचले क्लासमध्ये

सदर शिक्षकावर कारवाई करण्यासाठी दामिनी पथक थेट क्लासमध्ये पोहोचले. माझ्या मुलीला शिकवणी लावायची आहे, असा बहाणा करत संपूर्ण माहिती विचारून घेतली आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवत शिक्षकावर कारवाई केली.

छावणी पोलिसांची गाडी बोलावून सदर शिक्षकाला ताब्यात घेतले. मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानुसार, सहाय्यक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी मुलीचा जबाब नोंदवला.

मुलींनी तक्रार करण्याची हिंमत दाखवावी!

खासगी कोचिंग क्लासमधल्या शिक्षकाचे हे चाळे गेल्या अनेक महिन्यांपासून चालले होते. मात्र एका मुलीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघड झाला. इतर मुली मात्र या बाबत काहीही बोलायला तयार नाहीत. मुलींनी अशा प्रकरणांमध्ये उघडपणे बोलून तक्रार करण्याची हिंमत दाखवावी, शहर पोलीस मदतीसाठी सदैव तत्पर असतात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी